Walmik Karad Mother Protest : "माझ्या लेकावर अन्याय, त्याला मुक्त करा", वाल्मिकच्या आईचं ठिय्या आंदोलन

आज बीडच्या परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडूनही टॉवरवर चढून आंदोलन केलं जातं आहे. यावेळी वाल्मिक कराड यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे बीडमध्ये वातावरण तापणार असल्याचं दिसतंय.

Mumbai Tak

मुंबई तक

14 Jan 2025 (अपडेटेड: 14 Jan 2025, 01:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडच्या आईचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या

point

"माझ्या लेकावर अन्याय झाला, निर्दोष मुक्त होईपर्यंत इथेच बसणार"

point

वाल्मिक कराडला केलं केजमधील न्यायालयात हजर

"माझ्या मुलाला मुक्त करा. माझ्या लेकाने काहीच केलं नाही. माझ्या मुलावरचे गुन्हे सगळे खोटे आहे. कोण करतंय ते माहिती नाही. माझा लेकाला निर्दोष सोडत नाहीत तोपर्यंत मी उठणार नाही. कुणाला बघत नाही, माझ्या लेकाचं जगणं. माझ्या लेकावर अन्याय होतोय. जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय. खोटेनाटे गुन्हे दाखल केले जात आहेत असं" म्हणत वाल्मिक कराड यांच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh : "...म्हणून विष्णू चाटेच्या सुनावणीवेळी मी अनुपस्थित", सरकारी वकिलांनी सगळं सांगितलं

दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडूनही टॉवरवर चढून आंदोलन केलं जातं आहे. यावेळी वाल्मिक कराड यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे बीडमध्ये वातावरण तापणार असल्याचं दिसतंय.

वाल्मिक कराडला दिलेली 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपते आहे. त्यामुळे  आज वाल्मिकला पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पोलीस कस्टडी, न्यायालयीन कस्टडी की जामीन होणार यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे. वाल्मीक कराड याला प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये केस न्यायालयांमध्ये आणण्यात आलं.  त्याला न्यायालयात घेऊन येत असताना पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला होता. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"


दरम्यान, या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हे आदेश दिले असून, एक पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास जमावबंदी करण्यात आली आहे. 

    follow whatsapp