Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आंदोलन केल्यानंतर रोहित पवार, सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या कुटुंबाला आंदोलन करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"

सुषमा अंधारे, रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिनाभरापेक्षा जास्त काळ उलटला आहे. काही आरोपी ताब्यात घेतले असून, आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची काय चौकशी झाली? प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्यानं देशमुख कुटुंब अस्वस्थ झालं आहे. यामुळेच काल मस्साजोग गावात आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वत: धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले आणि गावात एकच गोंधळ झाला. धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्यासाठी जरांगेंनी अनेकदा विनंत्या केल्या. त्यानंतर ते खाली आहे. या सर्व धावपळीनंतर देशमुखांच्या बहिणीचीही प्रकृती बिघडली. एकूणच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा सध्या संघर्ष सुरू आहे. यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.
हे ही वाचा >> Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय
रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन सरकारवर टीका केली असून, या कुटुंबाला आंदोलन करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार काय म्हणाले?
"मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे, परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं.
राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं?