Rakhi sawant : राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी का घेतलं ताब्यात?

मुंबई तक

07 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:58 AM)

Rakhi sawant’s husband aadil Detained by police : राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी (Rakhi Sawant husband Adil Durrani) याला मंगळवारी सकाळी पोलिसांनी पकडले. सध्या आदिलवर 504, 506, 323 आणि 406 असे चार कलम लावण्यात आले असून त्याअंतर्गत (Police detained ) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आदिल सध्या ओसिवरा येथील पोलीस ठाण्यात (oshiwara police station) आहे, […]

Mumbaitak
follow google news

Rakhi sawant’s husband aadil Detained by police :

हे वाचलं का?

राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी (Rakhi Sawant husband Adil Durrani) याला मंगळवारी सकाळी पोलिसांनी पकडले. सध्या आदिलवर 504, 506, 323 आणि 406 असे चार कलम लावण्यात आले असून त्याअंतर्गत (Police detained ) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आदिल सध्या ओसिवरा येथील पोलीस ठाण्यात (oshiwara police station) आहे, जिथे त्याचे फोन जप्त करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. Adil’s phone was seized and the investigation started

राखी सावंतने aajtak.in शी बोलताना सांगितले की, पोलिसांनी सकाळी आदिलला पकडले आणि घेऊन गेले. त्याने माझ्यासोबत खूप वाईट केले आहे. सकाळी तो माझ्या घरी आला आणि माझ्याशी भांडू लागला. मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्याला घेऊन गेले. मी दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल केला होता. एनसी दाखल झाली होती, ज्याच्या आधारे पोलिसांनी त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर केले. तो काही न बोलता सकाळी मला भेटायला आला होता आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागला. मी याआधीही आदिलविरुद्ध दोनदा खटला दाखल केला होता, पण मीडियासमोर कधीही त्याचा उल्लेख केला नाही. त्यावेळी पोलिसांनीही आदिलला समजावले होते. काल रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राखीला घटस्फोट हवा आहे

राखी पुढे म्हणते, मला आदिलसोबत आता तडजोड करायची नाही. मी अशा माणसासोबत राहू शकत नाही जो इतक्या मुलींसोबत रिलेशनमध्ये राहतो. त्याने माफी मागावी आणि तनूला सोडून माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा होती. आता घटस्फोट घ्यायचा आहे, असे मी ठरवले आहे, असं राखी म्हणाली.

‘मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले’; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?

चार लाखांची रोकड व दागिने घेऊन पळ काढला

राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलने पैसेही लुटले आहेत. दोन दिवसांपूर्वी तो माझ्या घरातून चार लाखांचे दागिने घेऊन निघून गेला आहे. त्याने मला खूप मोठा चुना लावला. पैसे देऊनही खूप लुटले, असं ती म्हणाली. काल रात्री राखी आदिलसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करतानाही दिसली होती, ज्याच्या उत्तरात राखीने सांगितले की, आदिल अचानक माझी माफी मागण्यासाठी तिथे आला होता. मला त्याच्याशी बोलायचंही नव्हतं, पण तिथल्या मीडियाच्या सांगण्यावरून तो मला खाऊ घालू लागला. पण आम्ही बोललो नाही.

राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण..

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या निरीक्षक रजनी साळुंखे यांनी सांगितले की, आम्ही नुकतेच आदिलला सकाळी ताब्यात घेतले आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे. राखीने एफआयआर दाखल केला आहे. याआधीही राखीने दोनदा तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच सांगता येईल. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आदिलचा शोध घेत होतो. त्याला फोन केल्यावर तो भेटणे टाळायचा. आज सकाळी राखीला फोन आला की आदिल तिच्या घरी आहे. म्हणून आज आम्ही जाऊन त्याला पकडले. राखीचे जे काही आरोप असतील, ते पडताळले जातील, असं ते म्हणाले.

    follow whatsapp