ADVERTISEMENT
राज्य महिला आयोग नेहमीच महिलांच्या विकासासह इतर समस्यांवर योग्य ते पाऊल उचलत असतं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सरकारकडे विधवा महिलांसाठी एक विशेष मागणी करणार आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा असं संबोधलं जातं. हा शब्द चुकीचा आहे.’
‘विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द वापरावा.’ अशी मागणी राज्य महिला आयोग सरकारकडे करणार आहे.
महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाकणकरांनी हा मुद्दा मांडला.
‘कोरोना काळात 85 हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली. म्हणजे माझ्या 85 हजार भगिनी विधवा झाल्या.’
‘खरं तर हा शब्द अनेकदा उच्चारावा लागतो, पण हा उच्चार मला नको वाटतो. त्यामुळं विधवा हा शब्द काढून टाकावा अन पूर्णांगी हा शब्द द्यावा.’ अशी मागणी सरकारकडे केली जाणार आहे.
‘यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होईल.’ असं रुपाली चाकणकरांनी नमूद केलं.
ADVERTISEMENT
