PUNE: ‘बापट पॅटर्न’ने? रवींद्र धंगेकरांना बनवलं कसब्याचा आमदार?

मुंबई तक

• 09:38 PM • 06 Mar 2023

Ravindra Dhangekar: पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे कसब्याचा (Kasba) आमदार कोण होणार? भाजप (BJP) त्याचबरोबर महाविकास आघाडीने (MVA) आपली सर्व ताकद कसब्यामध्ये लावली होती. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसब्यात विजय मिळवला आणि भाजपच्या 28 वर्षापासून असलेल्या गडाला सुरुंग लावला. धंगेकरांचा विजय झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरु झाली अशा कुठल्या गोष्टींमुळे कसब्यात […]

Mumbaitak
follow google news

Ravindra Dhangekar: पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे कसब्याचा (Kasba) आमदार कोण होणार? भाजप (BJP) त्याचबरोबर महाविकास आघाडीने (MVA) आपली सर्व ताकद कसब्यामध्ये लावली होती. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसब्यात विजय मिळवला आणि भाजपच्या 28 वर्षापासून असलेल्या गडाला सुरुंग लावला. धंगेकरांचा विजय झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरु झाली अशा कुठल्या गोष्टींमुळे कसब्यात रवींद्र धंगेकरांना विजय सोपा झाला. धंगेकरांच्या विजयामागचं एक गमक सांगितलं जातं ते म्हणजे बापट पॅटर्न. (with bapat pattern ravindra dhangekar was made mla of the kasba peth constituency)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये बापटांच्या राजकारणाचा उल्लेख केला. आता नेमका हा बापट पॅटर्न काय आहे हे आपण समजावून घेऊया.

कसब्याची लढाई भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतरच लगेचच कसब्याची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सुरुवातीला भाजप टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु अखेर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीनंतर टिळक कुटुंबीयांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.

1995 पासून गिरीश बापट हे कसब्याचे आमदार होते. 2019 ला गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपचा गड कायम राखण्यात मुक्ता टिळक यांना यश आलं. कसबा मतदारसंघामध्ये ब्राह्मण मतदार अधिक असल्याने यंदा ब्राह्मण उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. कसब्याचं समीकरण पाहिलं तर कसब्यात ब्राह्मण मतदारांची संख्या ही 13 टक्के आहे. मराठा व कुणबी समाजाची संख्या ही 23.85 टक्के ओबीसी मतदारांची संख्या 31.45 टक्के इतकी, मुस्लिमांची 10.5 तर अनुसुचित जातींचे प्रमाण 9.67 तर अनुसुचित जमातींचे प्रमाण 4.17 टक्के इतकं आहे.

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी; विधानसभेला तर 200..’, संजय राऊतांचा दावा

गिरीश बापटांची कसब्यावर प्रचंड पकड होती. गिरीश बापटांची कसब्यात काम करणारी एक यंत्रणा होती, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं एक जाळं होतं. बापटांचे भाजपच्या मतदारांशी त्यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध होते. केवळ भाजपच नाही तर इतर पक्षातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी त्याचबरोबर मतदारांशी बापटांचे चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळे बापटांना 1995 पासून सलग विजय मिळवणं सोपं गेलं होतं.

शरद पवारांनी देखील बापटांविषयी बोलताना म्हंटलं आहे की, ‘बापटांनी अनेक वर्ष कसब्याचं प्रतिनिधीत्व केलं. बापट स्वतः लोकांमध्ये मिसळत होते. पुण्यातील बिगर भाजप वर्गाशी देखील त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे ज्याठिकाणी बापटांच लक्ष केंद्रीत आहे तो मतदारसंघ जड जाईल असं असेसमेंट आमचं होतं. शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्यानं निर्णय घेतले नाही. बापटांना डावलून, टिळकांना डावलून निर्णय घेतले. त्यामुळे त्याचे काय परिणाम होतील अशी एक चर्चा होती.’

VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल

गिरीश बापट यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाहीत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व प्रक्रिया हाताळली होती. हेमंत रासने यांना देण्यात आलेली संधी ही देखील पाटलांच्या शिफारशीमुळे झाली होती अशी देखील चर्चा आहे. त्याचबरोबर या निवडणुक प्रक्रियेत बापट आणि टिळकांना डावल्याचं देखील बोललं जातं.

बापटांनी ज्या पद्धतीने मतदारांशी संपर्क ठेवला होता त्या पद्धतीने रवींद्र धंगेकर यांनी देखील मतदारांशी नेहमीच संपर्कात होते. त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांच्या अडचणी सोडवण्यामध्ये धंगेकर आघाडीवर होते. दांडगा जनसंपर्क, मतदारसंघातील काम आणि नम्रता यामुळे धंगेकरांना मतदारांना आपल्या बाजूने वळवता आलं आणि त्यामुळेच भाजपचा गड धंगेकरांना जिंकता आला.

जिंकल्यानंतर देखील धंगेकरांनी गिरीश बापटांची भेट घेतली होती. ‘अडचण येईल तेव्हा मला सांग मी मदत करेन’ असं देखील बापट धंगेकरांना म्हणाले. त्यामुळे आता येत्या निवडणुकांमध्ये धंगेकर त्यांची विजयी घौडदौड कायम ठेवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गिरीश बापट फॅक्टर! शरद पवारांनी सांगितली रवींद्र धंगेकरांच्या विजयाची कारणं

    follow whatsapp