क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार

मुंबई तक

• 08:25 AM • 27 Dec 2021

– सुरेन्द्र रामटेके, वर्धा एका 14 वर्षाच्या मुलीला घरात कोंडून महिलेनं पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावल्याची संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही भयंकर घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या पतीसह महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. […]

Mumbaitak
follow google news

सुरेन्द्र रामटेके, वर्धा

हे वाचलं का?

एका 14 वर्षाच्या मुलीला घरात कोंडून महिलेनं पतीला तिच्यावर बलात्कार करायला लावल्याची संतापजनक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही भयंकर घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या पतीसह महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार पत्नीनेच पतीला अत्याचार करावयास लावल्याची घटना आर्वी तालुक्यात घडली. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडिता घरी एकटीच होती. पीडिता एकटीच असल्याचं दिसल्यानंतर आरोपी महिलेनं आपल्या घरी बोलावून घेतलं. पीडित मुलगी आरोपीच्या दाम्पत्याच्या घरी आली. त्यानंतर आरोपी महिलेनं ‘तू माझ्या पतीसोबत लग्न कर’, असं तिला म्हणत घराचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. त्यानंतर आरोपी महिला बाहेर निघून गेली.

धक्कादायक ! वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलेवर मावस जावयाकडून अत्याचार

त्यानंतर महिलेच्या पतीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर काही वेळाने आरोपी महिला घरी परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीला पीडितेवर नजरेसमोर बलात्कार करायला लावला. या घृणास्पद प्रकारानंतर आरोपी दाम्पत्याने झालेल्या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी पीडिताला दिली.

आरेापींच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यानंतर पीडितेनं घरी पोहोचताच संपूर्ण आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीने कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

वाशिम : अल्पवयीन विद्यार्थ्याला पाय चेपायला बोलावून शिक्षकाने केला अनैसर्गिक अत्याचार

पीडितेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दाम्पत्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 6 तसेच भादंविच्या कलम 376 (3), 76 (2) (एन), 366 (अ), 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp