धक्कादायक घटना! कुंड्या चोरल्याच्या कारणावरून दोन मुलांसह आईला लाठीने मारहाण, काढली धिंड

मुंबई तक

• 09:58 AM • 19 Dec 2021

–इम्तियाज मुजावर, सातारा फुलांच्या कुंड्या चोरल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने बेदम करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सगळं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलं आहे. धिंड काढणाऱ्या महिला पोलिसाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सविता आगम असे गुन्हा दाखल झालेल्या […]

Mumbaitak
follow google news

इम्तियाज मुजावर, सातारा

हे वाचलं का?

फुलांच्या कुंड्या चोरल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने बेदम करत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सगळं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केलं आहे. धिंड काढणाऱ्या महिला पोलिसाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सविता आगम असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस महिलेचं नाव आहे.

अधिक माहिती अशी की, गुरुवार (16 डिसेंबर) फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आगम यांनी फलटण शहरातील दत्तनगर येथील एका घरात घुसून दोन अल्पवयीन मुलं व त्यांच्या आईला काठीने वळ उमटेपर्यंत मारहाण केली.

लहान मुलांनी आणलेल्या फुलांच्या झाडाच्या कुंड्या डोक्यावर घेऊन आई व मुलांची महिला पोलीस कर्मचारी आगम यांनी स्वतःच्या घरापर्यंत शिवीगाळ करत धिंडही काढली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे तक्रार केली. तसेच कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, सिकंदर डांगे, संजय पवार, ताजुद्दीन बागवान यांनी दिला होता.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी बरडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महिला पोलीस आगम यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत किंद्रे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp