‘लोकांनी धर्माच्या भांगेच्या नशेत मतदान करावे हे कारस्थान’, भाजपवर जहरी टीका

मुंबई तक

01 Apr 2023 (अपडेटेड: 01 Apr 2023, 06:50 AM)

ShivSena vs BJP: रामनवमी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरात काही अप्रिय घटना घडल्या. ज्यानंतर शिवसेना (UBT) पक्षाकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

editorial of saamana once again criticized bjp today

editorial of saamana once again criticized bjp today

follow google news

Editorial of Saamana once again criticized bjp today: मुंबई: ‘2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे.’ अशा जहरी शब्दात शिवसेना (Shiv sena) (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) टीका करण्यात आली आहे. (after incident of violence across country including maharashtra on day of ram navami editorial of saamana once again criticized bjp today)

हे वाचलं का?

राज्यासह देशातील अनेक भागात रामनवमीच्या दिवशी दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ अशा अप्रिय घटना घडल्या. पण या हिंसक घटना घडवणं हे एक षडयंत्र असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसंच यावेळी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आहे.

    follow whatsapp