Amit Thackeray On Bhaver Kaware : मुंबईत मराठी लोकांना मच्छी, मटण खाण्यावरून अनेकदा डिवचलं गेलं आहे. तसेच अशा लोकांना घरं देखील नाकारली आहेत. अशीच एक घटना मुंबईच्या ताडदेव परिसरात घडली आहे. ताडदेव येथे एका घरासंदर्भात मांसाहरींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत अशा आशयाची डिवचणारी जाहिरात केल्याने भावेश कावरे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या जाहिरातीवरून ते चांगलेच अडचणीत आलेत. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्मान सेना नेते अमित ठाकरे यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी ट्विट करत कावरे यांची चांगलीच कानउघडणी केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल
तु जे बोलतोय ते अत्यंत चुकीचं असून लोक आता अडचणींवर बोलू लागले आहेत. अशातच त्यांचं लक्ष केंद्रित होताना तू असं बोलतोय. तू त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करतोय, असं अमित ठाकरे म्हणाले. प्रसिद्ध आणि पैशांसाठी ताण निर्माण केलाय. भावेश तुला माहितीये की, तु चांगलं काम करतोस, मीच तुला बोलावलं होतं. मग तुला कुठं कोणत्या गोष्टी सोडायला हव्यात असे अमित ठाकरेंनी भावेश कावरेला खडेबोल सुनावले.
अमित ठाकरेंचं जसंच्या तसं ट्विट
ताडदेव, मुंबई येथे “नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही” असे म्हणणारे इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी अमित राजसाहेब ठाकरे यांनी भावेश कावरे यांच्याशी संवाद साधत, समाजात विभाजन निर्माण करणारे किंवा जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही व्हिडिओ बनवू नयेत, असा सल्ला दिला.
हे ही वाचा : बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा
भावेश कावरेचा माफीनामा
दरम्यान, अमित ठाकरे यांनी भावेशला खडसावल्यानंतर त्याने माफीनामा दिला. मी मुंबईकरांची माफी मागत आहे. मी मराठी माणसाला घेत देत असून त्यांना घर देणार आहे. ही जाहिरात केल्यानंतर वाद होईल असं मला वाटलं नव्हत, मात्र भावना दुखावल्या असल्यास मी मुंबईकरांची माफी मागतो, असे भावेश म्हणाले.
ADVERTISEMENT












