Anil Parab reply Ramdas Kadam, Mumbai : "बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्री निवासस्थानात ठेवण्यात आला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते?" असे खळबळजनक आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केले होते. रामदास कदमांच्या या आरोपांना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईतील हनीट्रॅपचं आणखी एक प्रकरण! जळगावच्या व्यावसायिकाला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तब्बल 'इतके' रुपये...
अनिल परब म्हणाले, रामदास कदम यांनी नीचपणा केला. खरं म्हणजे याचं उत्तर आम्हाला देण्याची गरज वाटतं नव्हती. पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं, एवढी त्यांची लायकी नाही. मात्र, बाळासाहेबांच्या मृ्त्यूबाबत त्यांनी आरोप केलाय म्हणून मी प्रत्युत्तर देतो. प्रत्येक क्षणाला मी त्यावेळी उपस्थित होतो. रामदास कदम यांना बाळासाहेब गेल्यानंतर 14 वर्षानंतर कंठ फुलटलाय. बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर रामदास कदम यांनी मंत्री झाले. उद्धव ठाकरे चांगले नव्हते, तर त्यांनी उद्धव साहेबांकडून मंत्रिपद का स्वीकारलं? तेव्हाच त्यांनी पक्ष सोडून गेले पाहिजे होते. अशा माणसासोबत काम करणार नाही, असं त्यांनी तेव्हाच सांगायला हवं होतं. कोणताही मृतदेह शवपेटीशिवाय दोन दिवस ठेवता येतो का? रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात असल्याचंही अनिल परब म्हणाले आहेत.
"रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? "
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, बाळासाहेबांची प्रकृती खालावली होती, तेव्हा तिथे डॉक्टरांची मोठी टीम होती. अनेक लोकं भेटण्यासाठी उपस्थित होते. आमचं मत आहे की, नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदम यांच्यावर मी अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. 1993 मध्ये कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतलं होतं. तिने जाळून घेतलं की तिला जाळलं? काय झालं? याची देखील नार्को टेस्ट झाला पाहिजे. खेडमध्ये कोणाला बंगला बांधून दिला? त्याच्यावरुन काय राजकारण झालं? त्यांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री आहे. गृहखात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. स्वत:च्या बापाने 1993 मध्ये कोणते उद्योग केले? याची चौकशी झाली पाहिजे.
"घरातील लोक आत्महत्या करत आहेत, कशामुळे करत आहेत?"
मेलेल्या माणसाने ठसे घेतले तरी त्याचा उपयोग होत नाही. उद्धव साहेबांबद्दल लोकांमध्ये असलेले प्रेम कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यावर आरोप आहे, डान्सबार चालवणाऱ्यांना तुम्ही का वाचवत आहात? यांनी कोणा कोणाच्या जमिनी ढापल्यात? त्यांच्या घरातील लोक आत्महत्या करत आहेत? कशामुळे करत आहेत? याची देखील चौकशी झाली पाहिजे.
ADVERTISEMENT
