Basavaraj Patil : अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला आणखी एक झटका! माजी मंत्र्याचा राजीनामा

big jolt to congress : मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नेते असलेल्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राम राम केला.

Basavaraj Patil will be join bjp.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

भागवत हिरेकर

27 Feb 2024 (अपडेटेड: 27 Feb 2024, 08:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक झटका

point

बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडली

point

अशोक चव्हाणानंतर दुसरा नेता भाजपच्या वाटेवर

Basavaraj Patil News : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्री माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. (basavaraj patil resigned from Congress)

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेल्या अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात असतानाच आणखी एक राजीनामा पडला आहे. 

हेही वाचा >> 'लिमिटबाहेर गोष्ट गेली की, कार्यक्रमच करतो मी...', CM शिंदे स्पष्टच बोलले; जरांगेंना थेट इशाराच?

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बसवराज पाटील यांचं नाव हे काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यामध्ये घेतलं जात होतं. पाटील यांचा राजीनामा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर काँग्रेसलाही मोठा झटका आहे. 

भाजपत जाणार?

बसवराज पाटील यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होतं. पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचेही म्हटले जात होते. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने या शक्यता खरा ठरताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे. 

कोण आहेत बसवराज पाटील?

बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यात (पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा) असलेल्या उमरगा तालुक्यातील मुरूमचे रहिवासी आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणूनही त्यांना राजकारणात ओळखले जाते. 

औसा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २००९ आणि २०१४ मध्ये ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यमंत्री केले होते. 

हेही वाचा >> एका रात्रीत असं काय घडलं की, जरांगेंनी घेतली बिनशर्त माघार?

२०१९ मध्ये अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये बाजूला पडले होते. बसवराज पाटील यांची लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. त्यांनी कामही सुरू केले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून त्यांची लढण्याची इच्छा आहे. पण, धाराशिवची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळेल, हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे बसवराज पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. 

    follow whatsapp