शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य आणि तेजस ठाकरे मैदानात

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 06:43 PM)

Aditya Thackeray Protest : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले आहेत. अशातच आता वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आणि बंधू तेजस ठाकरे यांचा शिवसेना भवनासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

Aditya Thackeray Protest

Aditya Thackeray Protest

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शिवसेना UBT चे आंदोलन

point

आदित्य ठाकरे आणि बंधू तेजस ठाकरे रस्त्यावर

point

अमित ठाकरे यांना पोलिसांनी अडवले

Aditya Thackeray Protest : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले आहेत. अशातच आदित्य ठाकरे आणि बंधू तेजस ठाकरे यांचे शिवसेना भवनासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी पोलिसांची व्हॅन अडवल्याची माहिती समोर आली. लोकशाही वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे आता रस्त्यावर आलेत. याचदरम्यान मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांना देखील पोलिसांनी अडवल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : इंटरनेट सेवा, मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्ववत करा - सर्वोच्च न्यायालय

मुंबईत काय घडतंय? 

दादरच्या शिवाजीपार्कात कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. या हाकेला आता आदित्य ठाकरे आणि बंधू तेजस ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी शिवसेना भवनाबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले. याचदरम्यान पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांनी शिवाजी पार्क परिसरात फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केल्याची माहिती आहे. असंख्य कार्यकर्त्यांची पोलिसांनी अडवणूक केली आहे. 

हे ही वाचा : लातूर: मुली घरातही असुरक्षित, दोन्ही लेकींवर बापाचा लैंगिक अत्याचार; आईनं पाहिलं

अमित ठाकरे यांना पोलिसांनी अडवले

या आंदोलनात अमित ठाकरे उपस्थित होते, यादरम्यान पोलिसांनी त्यांना अडवले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जनता सामील झाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कारवाई करत असंख्य कार्यकर्ते, आंदोलकांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. आंदोलक आणि पोलिसांनी धरपकड होताना दिसत आहे. सेना भवनात पोलीस घुसले असता, अदित्य ठाकरेंनी घटनास्थळी धाव घेतली. एवढंच नाहीतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांची व्हॅन देखील अडवल्याची माहिती आहे.