Manoj Jarange : एका रात्रीत असं काय घडलं की, जरांगेंनी घेतली बिनशर्त माघार?

राहुल गायकवाड

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

google news

Manoj Jarange Latest big News : 'देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा आहे. त्याला मला संपवायचं आहे. त्याला माझं एन्काऊंटर करायचं आहे. त्याला मला पोलिसांकडून संपवायचं ना. मी येतो सागर बंगल्यावर... मी येतो... घे माझा जीव", असे म्हणत मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून निघाले. रात्री ते भांबेरी गावात थांबले मात्र, सकाळ होताच ते माघारी अंतरवाली सराटीला गेले. त्यामुळे फडणवीसांना इशारा देत मुंबईकडे निघालेले जरांगे परत का गेले, असा प्रश्न उपस्थित होतोय... नेमकं काय घडलं जाणून घ्या व्हिडीओमधून...

भांबेरी गावात मनोज जरांगे काय बोलले?

भांबेरी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून... त्याचा (देवेंद्र फडणवीस) जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. आपण आता अंतरवालीत जाऊ. तिथे एक निर्णय घेऊ."

"दम लागतो ना त्याला. स्वागत आहे म्हणे सागर बंगल्यावर, हे स्वागत आहे का? तो रात्री करणार होता हे. त्याच्यापेक्षा दहापट मी हुशार आहे. फक्त तू गृहमंत्री झालेला आहे", असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं. 

पुढे ते म्हणाले की, "आम्ही ठरवलं आहे की, या सगळ्यांना अंतरवालीत घेतो. या सगळ्यांना समजून सांगतो. कायद्याचा सन्मान कसा करायचा हे आपणही समजून घेतलं पाहिजे. बैठक संचारबंदीत कशी घेता येईल. संचारबंदी उठेलच ना... त्याला महाराष्ट्रात राहायचं आहे, आपल्यालाही राहायचं आहे.