Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025, सुरुवातीच्या कलांमध्ये कोण आघाडीवर?

Bihar Vidhansabha Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हा थोड्याच वेळात जाहीर होईल. सकाळी 8 वाजेपासून विविध मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 10:37 AM)

follow google news

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. यावेळी नितीश कुमार यांचे सरकार परत येईल का, की तेजस्वी यादव तेजाने झळाळून महाआघाडीला सत्तेपर्यत पोहोचवणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकालापूर्वी जाहीर झालेले बहुतेक एक्झिट पोल ट्रेंड पूर्ण बहुमतासह NDA ला सत्ता मिळेल असं दर्शवत होते. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे फेटाळला आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की, महाआघाडी 160 जागा जिंकेल. 

हे वाचलं का?

दरम्यान, बिहारमध्ये कोण जिंकणार, कोण हरणार यासह निकालाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला मुंबई Tak च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील.

बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे LIVE अपडेट

  • बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: निवडणूक निकालांमुळे भाजपच्या पाटणा कार्यालयातील जल्लोष थांबला असून काही पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांना अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, जल्लोष करण्याचा सल्ला दिला आहे. 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: गोपाळपूर मतदारसंघातून जेडीयूचे शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल 5485 मतांनी आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) पक्ष 16 जागांवर आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: पहिल्या फेरीत आतापर्यंत पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांना फक्त 672 मते मिळाली आहेत.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: सिवान मतदारसंघात आरजेडीचे अवध बिहारी पिछाडीवर तसेच, भाजपचे मंगल पांडे 1071 मतांनी आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: रामगड मतदारसंघातून मायावतींच्या पक्षाचे उमेदवार सतीश कुमार सिंह यादव 97 मतांनी आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 15 जागांवर आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: कुटुंबा विधानसभा काँग्रेसचे राजेश राम पिछाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: जेडीयू भाजपला मागे टाकत आघाडीवर, भाजप 70 जागांवर पुढे, तर जेडीयू 75 जागांवर आघाडीवर 
  • विधानसभा निवडणूक निकाल लाईव्ह अपडेट: महुआपासून एनडीए 1409 मतांनी पुढे, तेज प्रताप तिसऱ्या क्रमांकावर.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: एनडीए 158 जागांवर आघाडीवर तर महागठबंधन 74 जागांवर पुढे.... 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: कटिहारच्या बलरामपूर मतदारसंघाची परिस्थिती

          एआयएमआयएम - 2716 (आदिल हुसेन)
          सीपीआय एमएल - 2479 (मेहबूब आलम) 
          एलजेपी - 1995 (संगीता देवी)
          एआयएमआयएम उमेदवार 237 मतांनी आघाडीवर 

  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल भाजप कार्यालयात पोहोचत आहेत.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: बनियापूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत, आरजेडीच्या चांदनी देवी यांना आतापर्यंत 11,697 मते मिळाली आहेत, तर भाजपचे केदारनाथ सिंह यांना 10,145 मते मिळाली आहेत. दोघांमध्ये 1,552 मतांचा फरक आहे.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू. दरम्यान, अनंत सिंग 2,716 मतांनी आघाडीवर 
  • विधानसभा चुनाव 2025 लाईव्ह अपडेट्स: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीएला बहुमत मिळालं असून एनडीए 126 जागांवर आघाडीवर आहे.
  • विधानसभा चुनाव 2025 लाइव्ह अपडेट्स: पाटणाच्या दिघा मतदारसंघातून भाजपचे संजीव चौरसिया हे दिव्या गौतम (सुशांत सिंह राजपूतची चुलत बहीण) यांच्यावर आघाडीवर 
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: बरुराजमध्ये भाजपचे अरुण सिंह आघाडीवर, तर व्हीआयपी इंजिनीअर राकेश कुमार आघाडीवर. जनसुराज 781 मतांनी पुढे आणि भाजप 651 मतांनी आघाडीवर आहे. दरम्यान, लालगंजमध्ये आरजेडीच्या शिवानी शुक्ला आघाडीवर असून रघुनाथपूरमध्ये ओसामा आघाडीवर 
  • बिहार विधानसभा निवडणूक 2025 लाइव्ह अपडेट्स: साहेबगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजू सिंह 4453 मतांनी आघाडीवर, आरजेडीचे पृथ्वीनाथ राय 3162 मतांनी तर भाजपचे राजू सिंह साहेबगंज 1219 मतांनी आघाडीवर 
  • बिहार विधानसभा निवडणूक 2025 लाइव्ह अपडेट्स: तेज प्रताप यादव महुआ मतदारसंघातून पिछाडीवर 
  • बिहार निवडणूक 2025 लाईव्ह अपडेट्स: शेखपुरा विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत जेडीयू आघाडीवर
  • विधानसभा निवडणूक 2025 लाइव्ह अपडेट्स: आलमनगरमधून व्हीआयपी पुढे
  • विधानसभा निवडणूक 2025 लाइव्ह अपडेट्स: सुरुवातीचे ट्रेंड्समध्ये जेडीयू आघाडीवर

          छटापूर: भाजप आघाडीवर
          निर्मली: जेडीयू आघाडीवर
          पिप्रा: जेडीयू आघाडीवर
          सुपौल: जेडीयू आघाडीवर

  • विधानसभा निवडणूक 2025 चे लाईव्ह अपडेट्स: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप 45 जागांवर आणि आरजेडी 44 जागांवर आघाडीवर 
  • 2025 चा बिहार विधानसभा निवडणूक निकाल: भाजप 46 जागांवर तर आरजेडी 45 जागांवर आघाडीवर, जेडीयू सध्या तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून तो 34 जागांवर पुढे आहे.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह:  सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये कुम्हारार, चनपटिया आणि करहागरमध्ये जान सूरज आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.

          किशनगंजमधून काँग्रेसचे कमरूल होडा आघाडीवर
          बहादूरगंजमधून काँग्रेसचे मुसाविर आलम आघाडीवर 
          ठाकुरगंजमधून राजदचे सौद आलम आघाडीवर
          कोचधामनमधून आरजेडीचे मास्टर मुजाहिद आघाडीवर

  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये तेज प्रताप पिछाडीवर
  • बिहार निकाल 2025 लाईव्ह अपडेट: चनपाटिया येथून जनसुराजचे मनीष कश्यप आघाडीवर, जनसुराज एकूण 4 जागांवर पुढे 
  • महुआ मतदारसंघाचा निकाल 2025: तेज प्रताप यादव पुन्हा एकदा महुआ मतदारसंघातून आघाडीवर. त्यांचा पक्ष आतापर्यंत फक्त एकाच जागेवर पुढे
  • निवडणूक निकाल 2025 लाईव्ह:  50 हून अधिक जागांचे ट्रेंड

         'व्हीआयपी'चं खातं अद्याप उघडलेलं नाही
         राजनगरमधून भाजपचे सुजित पासवान आघाडीवर 
         खजोलीमधून आरजेडी आघाडीवर
         हरलाखीमध्ये जेडीयू आघाडीवर

  • निवडणूक निकाल 2025 लाईव्ह:  50 जागांवर ट्रेंड, एनडीए 31 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 22 जागांवर आघाडीवर, एनडीए 34 जागांवर आघाडीवर, भाजप 23 जागांवर पुढे.
  • बिहार निवडणूक निकाल 2025 लाईव्ह: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, जनसुराज 03 जागांवर आघाडीवर.
  • Bihar Election Results 2025 LIVE: बिहार निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर, ईव्हीएममध्ये नोंदलेल्या मतांची मोजणी सुरू होईल. प्रत्येक जागेसाठी मिनिट-टू-मिनिट अपडेट्स येथे पहा.
  • पोस्टल मतमोजणीला झाली सुरूवात
  • बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

 

    follow whatsapp