BJP Candidates list for Maharashtra Vidhan Parishad elections : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे हे भाजपचे उमेदवार असतील. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे भाजपने जाहीर केलेल्या तीन उमेदवारांसाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
ADVERTISEMENT












