Maratha Reservation : ‘मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला’, छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

03 Feb 2024 (अपडेटेड: 03 Feb 2024, 03:05 PM)

मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.

chhagan bhujbal big statement on resignation on minister post obc mahaelgar melava ahmednagar news

chhagan bhujbal big statement on resignation on minister post obc mahaelgar melava ahmednagar news

follow google news

Chhagan Bhujbal On Resignation Minister Post : कोणी म्हणतो राजीनामा दिला, कोणी म्हणतो देत नाही आणि कोणी म्हणतो लाथा घाला, पण याची काही गरज नाही. मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि अंबडच्या सभेला रवाना झालो होता, असा खळबळ उडवून टाकणारा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी केला आहे. भुजबळांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे. (chhagan bhujbal big statement on resignation on minister post obc mahaelgar melava ahmednagar news)

हे वाचलं का?

अहमदनगरमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून ओबीसी समाजाला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना, स्व: सरकारमधील आणि स्व: पक्षातील नेत्यांना मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.

हे ही वाचा : Ganpat Gaikwad: ‘हा गोळीबार नाही.. शिंदे-फडणवीसांमधील गँगवार’, सुषमा अंधारेंच्या विधानाने खळबळ

कुणी म्हणतो राजीनामा दिला, कुणी म्हणतो का देत नाही, कुणी म्हणतो भुजबळांच्या कंबरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. पण काही गरज नाही दिलेला आहे मी राजीनामा. लाथ मारण्याची मला गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की कुठेही वाच्यतो नको, म्हणून मी अडिच महिने शांत राहिलो, गप्प बसलो, असे देखील भुजबळ सांगतात.

मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही आहे. पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही. पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पुर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शपथ पुर्ण झाली असेल तर मागासवर्ग आयोग कशासाठी? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

हे ही वाचा : Bharat Ratna: लालकृष्ण अडवाणींमुळे वाचलेली मोदींची खुर्ची.. जाणून घ्या त्यांच्या नात्याची संपूर्ण कहाणी

शिंदे गटाचा आमदार काय म्हणाला?

आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ‘भुजबळ मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, कंबरेत लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा.‘एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका एका धर्माविरोधात आणि समाजाविरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा नाही. त्यामुळे ताबोडतोब या भुजबळाला घरचा रस्ता दाखवा.’ अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.’

    follow whatsapp