'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का?', पुण्यात CM फडणवीसांनी सांगितली A to Z स्टोरी

CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : मातोश्रीच्या बंद खोलीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता की नाही? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केलाय.

CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

मुंबई तक

• 05:30 PM • 08 Feb 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

CM देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना लावला पूर्णविराम

point

"बाळासाहेबांची एक मोठी रुम आहे, त्या रुममध्ये..."

point

मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2014 मध्ये शिवसेना-भाजप यूती तुटली होती. पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला गेला. 2019 च्या फेब्रुवारीत असा प्रयत्न झाला. जेव्हा अमित शाहा आणि फडणवीस मातोश्रीवर गेले होते. असं म्हटलं जात होतं, बंद खोलीत अडीच-अडीच वर्षांचं वचन दिलं गेलं होतं. पण नऊ महिन्यानंतर विधानसभेचे निकाल जाहीर झाले, निकाल येईपर्यंत युती होती. पण निकाल आल्यानंतर एक तासात युती तुटली. भाजप धोखा देत आहे, दिलेलं वचन पूर्ण करत नाही, असं म्हटलं गेलं. तुम्ही (देवेंद्र फडणवीस), अमित शाहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडीच वर्षांसाठी नाही म्हटलं असेल, तर ते कसं म्हटलं? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भाऊ तोरसेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यानंतर फडणवीसांनी सर्व गोष्टींबाबत खुलासा केला. फडणवीस पुण्यात 'जयपुर डायलॉग' आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता का? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होती आणि आम्ही युतीसाठी बसलो. जवळपास युती निश्चित झाली होती. एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला म्हटलं, देवेंद्रजी आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. याबाबत मी तुमच्या वरिष्ठांनाही सांगितलं आहे. अंतिम निर्णय आज घेतील, असं ते म्हणाले. रात्री 1 वाजलं होतं. मी त्यांना म्हणालो हा निर्णय मी घेऊ शकत नाही. माझा पक्ष पार्लिमेंटरी बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेते. आमचे अध्यक्ष अमितभाई आहेत. मी अमितभाईंसोबत बोलतो. मी अमितभाईंना सांगितलं, आमचं जागांबाबत एकमत झालंय. पुढच्याही गोष्टी मान्य झाल्या आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. तेव्हा अमितभाईंनी सांगितलं की, हे आम्हाला मंजूर नाही. असं असेल तर युती होणार नाही, असं त्यांना सांगा.

हे ही वाचा >>  Big Breaking: अरविंद केजरीवालांचा दारूण पराभव, विजय मिळवणारा 'तो' जायंट किलर कोण?

फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत. पुढेही राहणार आहोत. त्यामुळे पाच वर्ष आमचा मुख्यमंत्री असेल. मागील वेळेस आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं, आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, असं नाही होणार. मग दे त्यांच्या रस्त्याने गेले. मी माझ्या रस्त्याने गेलो आणि आमची युती झाली नाही. जवळपास चार दिवसानंतर उद्धव ठाकरेंकडून मेसेज आला, पुन्हा चर्चा करायची आहे. त्यांनी सांगितलं तो मुद्दा सोडला आहे, लोकसभेची एखादी जागा वाढवून पाहिजे. ते जर तुम्ही दिलं, तर अडीच वर्षांची गोष्ट सोडून देऊ. आम्ही पुन्हा बसलो तर ते म्हणाले आम्हाला पालघरची जागा पाहिजे. मी त्यालाही तयार नव्हतो. कारण ती आमची पारंपारीक जागा आहे. आम्ही तिथे सलग विजय मिळवला आहे. पण अमितभाईंसोबत चर्चा झाल्यानंतर जागा द्यायचा निर्णय झाला.

हे ही वाचा >> Delhi Election 2025: "आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलो नाहीत, तर...", अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

बंद खोलीच्या चर्चेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, "बाळासाहेबांची एक मोठी रुम आहे. त्या रुममध्ये मी, आदित्य आणि वहिनी (रश्मी ठाकरे) बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे असे म्हणाले, पत्रकार परिषदेत तुम्ही असं बोला की, सत्तेत तुम्हाला सहभागी केलं जाईल. काय बोलायचं आहे, हे मी निश्चित केलं. त्यानंतर त्यांनी वहिनींना बोलावलं. तेव्हा मी बोलायचं सर्व काही रिवाईंड केलं. त्यांनतर ते म्हणाले सर्व चांगलं झालं. नंतर आमची पत्रकार परिषद झाली. जे ठरलं होतं ते सर्व मी यावेळी सांगितलं. जर त्यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली असेल, तर मला सांगितलं असतं ना..पण तसं काहीही झालं नव्हतं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी, अमित शाहा, नड्डा यांनी अनेकदा भाषणात म्हटलं, देवेंद्रंच्या नेतृत्वात लढत आहोत. देवेंद्र मुख्यमंत्री होतील. जेव्हा ही घोषणा होत होती, तेव्हा उद्धव ठाकरेही टाळ्या वाजवत होते. मुख्यमंत्रीपदाच्या शब्दाबाबत त्यांना एकप्रकारे भासच होत होता". 

    follow whatsapp