मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर? अचानक सुट्टीमागचं कारण काय?

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 25 Apr 2023, 06:25 AM)

CM Eknath shide goes on 3 days leave : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीची माहिती दिली नाही आहे, मात्र सुत्रांकडून याबाबतची माहिती मिळाली आहे

CM Eknath shide goes on 3 days leave

CM Eknath shide goes on 3 days leave

follow google news

CM Eknath shide goes on 3 days leave : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तीन दिवस रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीची माहिती दिली नाही आहे, मात्र सुत्रांकडून याबाबतची माहिती मिळाली आहे.एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. (cm eknath shide goes on 3 days leave what are reason behind)

हे वाचलं का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या कर्मचार्‍यांना सांगितले की, ते त्यांच्या गावी साताऱ्याला जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती आहे. या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मुळ गावी सातारामध्ये गेले असल्याचे बोलले जात आहे. गावी पुजा आणि प्रार्थना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात गेले आहेत.दरम्यान एकीकडे राज्यात राजकारण पेटले असताना मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्याने अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहे.

हे ही वाचा : खारघर दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कॉंग्रेस आमदाराची मागणी

‘या’ कारणामुळे सुट्टीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातलं पहिले कारण सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देणार आहे. या निकालावर अनेक गोष्टी निर्भर असणार आहेत. कारण जर निकाल शिंदेच्या बाजूने लागला तर सरकार कायम राहील. आणि जर निकाल विरोधात लागला तर शिंदे गटाला मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी देखील ते देवाकडे साकडे घालायला गेल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार,मग पाटावर कोण बसणार? ठाकरे गटाची शिंदेंवर टीका

सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या विरोधात निर्णय़ लागल्यास सरकार पडू शकते. त्यामुळे सरकार कायम राहावे यासाठी भाजप प्लान बी आखतेय, ज्यामध्ये अजित पवारांना सोबत घेऊन सरकार टीकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजपने अजित पवारांना सोबत घेण्याची गोष्ट कदाचित शिंदेंना पटली नसावी,त्यामुळे ते राजकीय दृष्ट्या दु:खी आहेत. यातूनच के सुट्टीवर असल्याचेही बोलले जातेय.

खारघर दुर्घटनेत 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी या संपूर्ण घटनेचे खापर सरकारवर फोडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. सोमवारी 24 एप्रिलला विरोधकांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.याच दबावातून देखील ते रजेवर असल्याची चर्चा होतेय.

    follow whatsapp