मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार,मग पाटावर कोण बसणार? ठाकरे गटाची शिंदेंवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

thackeray group criticize eknath shinde on samana editorial
thackeray group criticize eknath shinde on samana editorial
social share
google news

Thackeray group criticize eknath shinde government : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून खुप मोठा रस्सीखेच सुरू आहे.अजित पवार (Ajit pawar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्यात आल्यानंतर या घटनेला आणखीणच ऊत आले आहे. अशात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारचं 15 दिवसांचं डेथ वॉरंट जारी केलं होतं.या वॉरंटनंतर सामना अग्रलेखातून आता मुख्यमंत्री लवकरच जाणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे.यासोबत त्यांच्या जागी कुणाला बसवणार, असा सवाल देखील करण्यात आला आहे. त्याचसोबत या अग्रलेखात खारघर दुर्घटना, रिफानरी सारख्या विषयावरून शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करण्यात आले आहे. (thackeray group criticize eknath shinde and devendra fadnavis on samana editorial)

अग्रलेखात काय?

राज्याला मुख्यमंत्री आहेत की नाही?असा प्रश्न पडलाय. मुख्यमंत्रीपदावरून रोज चर्चा घडतेय. अजित पवार (Ajit pawar) यांना मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारले असता, 2024 पर्यंत का थांबता? आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे सांगणे गैर ते काय? असे सामना अग्रलेखातून समर्थन देण्यात आले आहे. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच’ (devendra fadnavis) , असे विधान करून शिंदे-मिंधे गटाचे कपडे उतरवल्याची टीका केली. एकूणच सध्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण मोजत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हे ही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री होणार? उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिला मोठा प्रस्ताव

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) तर विखे पाटलांच्या शंभर पाऊल पुढे गेल्याचे अग्रलेखात म्हणत, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे काय? कोणीही इच्छा बाळगू शकतो, पण योग्यता हवी ना? फडणवीसांनी हे विधान हसत हसत केले असले करी त्यामागे वैफल्य आणि त्रागा आहे. हा त्रागा सवती मत्सराचा आहे. तसेच भर मंडपात वरमाला, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडविले गेले, त्या धक्क्यातून अद्याप ते सावरलेले दिसत नाहीत,अशी टीका देखील अग्रलेखातून करण्यात आलीय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खारघरमध्ये फडणवीस (devendra fadnavis) यांच्या डोळ्यासमोर 16 जणांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला.लोक चेंगरून मेले या सरकार पुरस्कृत हत्येवर फडणवीस बोलायला तयार नाहीत. सत्तेची ही कोणती देशी नशा त्यांना चढली आहे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. तसेच कुनो राष्ट्रीय उद्यानातील एका आफ्रिकन चित्याचा मृत्यू होताच पंतप्रधानांना दु:ख झाले, पण 16 श्री सेवकांच्या मृ्त्यूवर, सदोष मनुष्यवधावर कोणी बोलायला तयारी नाही, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

हे ही वाचा : ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या पुतळ्याचं शिंदेंच्या आमदाराने का केलं शुद्धीकरण?

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाविऱोधात आंदोलन करणाऱ्यांवर फडणवीसांचे पोलीस बंदूका घेऊन उभे आहेत. रिफायनरी विरोधातील आंदोलन चिरडायचे, मग त्यात आंदोलकांचे बळी गेले तरी चालतील, असे अमानुष धोरण मिंधे-फडणवीस सरकारचे असल्याची टीका अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT