Lok Sabha Election 2024: 'भटकती आत्मा'वरून शरद पवारांचा PM मोदींना टोमणा
Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या एका टीकेला आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar vs PM Modi: श्रीगोंदा: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना 'भटकती आत्मा' असं म्हणत जहरी टीका केली होती. पण आता त्याच टीकेला शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (lok sabha election 2024 sharad pawar taunts pm modi over wandering soul)
ADVERTISEMENT
'त्यांना मला सांगायचं आहे, की ५० नाही, तर मला विधानसभेत येऊन ५६ वर्षे झाली, त्यामुळे हा आत्मा ५६ वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. तोच ५६ वर्षे हे शोधतोय, या ५६ वर्षांमध्ये मोदी सारखी कोणी व्यक्ती आली नव्हती.' असं पवार यावेळी म्हणाले.
भटकती आत्मावरून मोदींची टीका, पवारांनी दिलं उत्तर
'या निवडणुकीमध्ये काहीही झालं, तरी चालेल पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल, त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेबांचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले, अनेक ठिकाणी जातात. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.'
हे वाचलं का?
'देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. पण त्यांना दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल, त्या ठिकाणी बोलतात. सोलापूरला गेले माळशिरसला, आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये गेली ५० वर्षे एक आत्मा हिंडतेय म्हटले सगळीकडे.'
'त्यांना मला सांगायचं आहे, की ५० नाही, तर मला विधानसभेत येऊन ५६ वर्षे झाली, त्यामुळे हा आत्मा ५६ वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. तोच ५६ वर्षे हे शोधतोय, या ५६ वर्षांमध्ये मोदी सारखी कोणी व्यक्ती आली नव्हती.'
'आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंह राव पहिले, अनेकांबरोबर काम केलं. त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणीतरी आत्मा आहे, त्याची चिंता मोदींना वाटते. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, त्यासाठी तो महाराष्ट्रात हिंडतोय. त्यामुळे या सगळ्यासंबंधी अधिक बोलण्याचं काम नाही.' असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT