PM Modi: 'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..', आंध्रप्रदेशातून मोदींची ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..'
'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..'
social share
google news

Lok Sabha Election 2024: मुंबई: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबाबत केलेल्या एका विधानावरून आता लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) चं रण चांगलंच पेटलं आहे. पित्रोदा यांच्या टिप्पणीवर थेट पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र, आंध्रप्रदेशमध्ये बोलत असतानाही पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे. (lok sabha election 2024 balasaheb thackerays fake shiv sena son pm modi venomous criticism of thackeray from andhra pradesh)

'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची मुलं (संतान) आहेत.. जरा बाळासाहेबांना आठवून बघा.. मी नकली मुलांना (संतान) विचारू इच्छितो.. मी जरा त्यांचे मेंटॉर (शरद पवार) ज्येष्ठ नेत्यालाही विचारू इच्छितो.. की, पश्चिम भारतातील लोकं हे अरबी लोकांप्रमाणे दिसतात.. काय महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे का?', असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ठाकरे आणि पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. 

पाहा पंतप्रधान मोदींनी आंध्रप्रदेशमधील भाषणात ठाकरे-पवारांना कसं केलं टार्गेट 

काँग्रसेच्या एका मोठ्या नेत्याने पुन्हा एकदा काँग्रेसची विभाजित करण्याच्या विचारांचं प्रदर्शन केलं. गांधी परिवाराच्या अगदी जवळ असणाऱ्या आणि शहजाद्याच्या सगळ्यात मोठ्या सल्लागाराने जे म्हटलं आहे ते शरम आणणारं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'अंबानी-अदाणी टेम्पोतून पैसे देतात हा..', राहुल गांधींचा मोदींना सवाल!

काँग्रेसला वाटतं की, जी लोकं ईशान्य भारतातील आहेत ते चायनीज असल्यासारखे वाटतात. काय अशा गोष्टी देश स्वीकारू शकतो? काँग्रेसला वाटतं दक्षिण भारतातील लोक हे आफ्रिकन सारखे दिसतात, मी जरा सिद्धरमय्या यांना विचारू इच्छितो की, काय कर्नाटकातील लोकांवरचा हा आरोप तुम्ही स्वीकार कराल का? 

मी तेलंगणा, तमिळचा मुख्यमंत्रांना विचारतो या गोष्टी ते स्वीकार करतील का? एवढा मोठा आरोप लावला आहे.. डीएमके काँग्रेससोबत युती तोडेल का? तेवढी त्यांचा हिंमत आहे का? 

ADVERTISEMENT

काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातील लोकं ही अरबी लोकांसारखे दिसतात. मी जरा.. बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची मुलं (संतान) आहेत.. जरा बाळासाहेबांना आठवून बघा.. मी नकली मुलांना (संतान) विचारू इच्छितो.. मी जरा त्यांचे मेंटॉर (शरद पवार) ज्येष्ठ नेत्यालाही विचारू इच्छितो.. की, पश्चिम भारतातील लोकं हे अरबी लोकांप्रमाणे दिसतात.. 

काय महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे का? काँग्रेसला वाटतं की, उत्तर भारतातील लोकं गोऱ्या लोकांसारखे दिसतात.. तुम्ही ही गोष्ट स्वीकारू शकता का? सत्तेसाठी देशाची फाळणी करणारी काँग्रेस आता भारतीयांवर वंशभेदी टिप्पणी करत आहे. 

ADVERTISEMENT

सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणालेले?

सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते भारताच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांची वादग्रस्तपणे तुलना करताना दिसत आहेत.

हे ही वाचा>> 'Ambani-Adani यांच्याकडून किती 'माल' उचलला?, मोदी असं का बोलले?

या व्हिडिओमध्ये सॅम पित्रोदा म्हणतात की, 'भारत हा एक अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे, जेथे पूर्व भारतात राहणारे लोक चिनी लोकांसारखे आहेत, पश्चिमेकडे राहणारे लोक अरबांसारखे आहेत, उत्तर भारतात राहणारे गोरे आणि आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. . पण याने काही फरक पडत नाही. आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत.'

'आम्ही विविध भाषा, धर्म आणि चालीरीतींचा आदर करतो. हा तोच भारत आहे ज्यावर माझा विश्वास आहे, जिथे प्रत्येकाचा आदर केला जातो आणि प्रत्येकजण थोडीशी तडजोड करतो.' असं पित्रोदा म्हणाले. 

सॅम पित्रोदा यांच्या याच विधानामुळे आता भाजप आणि पंतप्रधान मोदी हे आक्रमक झाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT