Mazi Ladki Bahin Yojana: पुण्यात 'लाडकी बहीण'वरून वाद का पेटलाय?, 'तो' फोटो अन्..

complaint filed in the case of using photos of some women without permission for the banner of mazi ladki bahin yojana in pune

पुण्यात 'लाडकी बहीण'वरून वाद का पेटलाय? (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यात 'लाडकी बहीण'वरून वाद का पेटलाय? (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई तक

31 Jul 2024 (अपडेटेड: 31 Jul 2024, 12:28 AM)

follow google news

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात लागू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेवरून दररोज नवनवे राजकीय वाद पेटत असल्याचं पाहायला मिळतंय. योजनेला निधी देणार कोण? यावरून सरकारमध्येच मतभेद असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. भाजपने लावलेल्या 'लाडकी बहीण' योजनेच्या बॅनरवर परवानगी शिवाय काही महिलांचे फोटो वापरण्यात आल्याच्या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिणामी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊयात. (complaint filed in the case of using photos of some women without permission for the banner of mazi ladki bahin yojana in pune)

हे वाचलं का?

तर झालं असं की पुणे शहरात भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी 'लाडकी बहीण' योजनेची मार्केटिंग करणारे बॅनर लावलेत, याबद्दलचे फोटोही शिरोळेंनी फेसबुकवर शेयर केलाय. परंतु बॅनरवर ज्या दोन महिला दिसताहेत, त्यांनी पोलिसांत धावत घेतली.

हे ही वाचा>> Akola MNS: मनसेला हादरवणारी बातमी, अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!

'आमचा फोटो कुणी काढला, तो बॅनरवर लावला कसा? हे आम्हाला माहिती नाही, तो आमदार कोण आहे? हे देखील आम्हाला माहिती नाही, अशी रोखठोक भूमिका घेत तक्रारदार महिलेने या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केलीय. 

महिलांचे फोटो परवानगी शिवाय वापरण्यात आले असतील तर ही नक्की गंभीर बाब आहे, तक्रारदार महिला भगीरथीबाई कुरणे यांचा फोटो तर वापरलाच शिवाय नम्रता कावळे या महिलेचाही फोटो बॅनरवर लावण्यात आलाय. या घटनेमुळं त्यांचं प्रकरण तर कौंटुबिंक भांडणापर्यंत गेलंय, गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते, असं त्या सांगत आहेत.

हे ही वाचा>> चित्रा वाघ यांची 'ऑडिओ क्लिप'.. विद्या चव्हाणही भिडल्या, नेमकं काय घडलं?

ज्या बॅनरवर फोटो लावण्यात आले, त्यावर या दोन्ही महिलांनी आक्षेप घेतलाय. ज्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली, त्या आमदार सिद्धार्थ शिरोळेंनीही मौन धारण केल्यानं या प्रकरणातील गूढ आणखी वाढलंय. त्यामुळं आता या तक्रारींवर पुणे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

    follow whatsapp