Akola MNS: मनसेला हादरवणारी बातमी, अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!
आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला करणारा मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकाचा मृत्यू

मनसैनिक जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मिटकरींसोबत झालेल्या राड्यानंतर जय मालोकारला रुग्णालयात करण्यात आलेले दाखल
Amol Mitkari Car attack and MNS Worker Death: धनंजय साबळे, अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर आज (30 जुलै) अकोल्यात मनसे नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला. यावेळी बराच राडाही झाला. पण आता या घटनेतील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. मिटकरींच्या कारची तोडफोड करणाऱ्यांमधील आरोपी आणि मनसैनिक जय मालोकार याचा काही वेळापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. (akola mns shocking news for mns mns party worker jay malokar who attacked ncp mla amol mitkari car dies of heart attack)
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर जो राडा मनसैनिकांकडून करण्यात आला त्यामध्ये जय मालोकार हा देखील सहभागी होता. पण याच राड्यानंतर मालोकार याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आलं. राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
हे ही वाचा>> Uddhav Thackeray : मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."
मात्र, काही वेळापूर्वीच त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. त्यामुळे अकोल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह सर्वच मनसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.
मनसैनिकांच्या अटकेसाठी अमोल मिटकरींचं पोलीस ठाण्यात सुरू होतं धरणं आंदोलन
आमदार अमोल मिटकरी यांचे दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरूच होतं. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हे आंदोलन सुरू होतं. जोपर्यंत आरोपी मनसे कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत तेथून हलणार नसल्याचे मिटकरी यांनी म्हटलं होतं. हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून नंतर पळ काढल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केला होता.