नवी दिल्ली: दिल्ली निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. पण काँग्रेसमुळेच 'आप'ला तब्बल 12 जागांवर पराभव पत्करावा लागला. जर दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असती तर दिल्ली विधानसभेची परिस्थिती ही वेगळी असती. काँग्रेसमुळे 'आप'ला कोणत्या 12 जागांवर पराभव पत्करावा लागला ते आपण आता पाहूया.
ADVERTISEMENT
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. त्याच वेळी, गेल्या 12 वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसचा पराभव निश्चितच झाला, पण 70 जागांपैकी 12 जागांवर काँग्रेसमुळे 'आप'ला पराभव पत्करावा लागला.
हे ही वाचा>> Big Breaking: अरविंद केजरीवालांचा दारूण पराभव, विजय मिळवणारा 'तो' जायंट किलर कोण?
दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला आणि 'आपसात अधिक लढा...' असा टोमणा मारला आहे. या विधानाचा अर्थ असा आहे की, काँग्रेसमुळे 'आप'चा पराभव झाला.
जर आप आणि काँग्रेसमध्ये युती झाली असती तर दिल्लीत दोन्ही पक्षांच्या युतीच्या जागा 37 झाल्या असत्या, म्हणजेच बहुमतापेक्षा एक जागा जास्त. खरं तर, 12 जागा अशा होत्या जिथे 'आप'च्या पराभवाचे अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते.
काँग्रेसच्या मतांवर 'आप'चा कब्जा
दिल्लीत भाजप आणि काँग्रेस हे बऱ्याच काळापासून प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. काँग्रेसला भाजपविरोधी मते मिळत राहिली आणि भाजपला काँग्रेसविरोधी मते मिळत राहिली. पण 2013 मध्ये 'आप'च्या उदयानंतर काँग्रेसची मते 'आप'ने आपल्याकडे खेचून घेतली.
हे ही वाचा>> "दिल्लीच्या जनतेनं शॉर्टकट राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं आणि...", PM नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवालांवर निशाणा!
2013 नंतर 'आप'च्या मतांची टक्केवारी वाढतच राहिली, तर काँग्रेसची मतं घटली
2013 मध्ये आम आदमी पक्षाला 30 टक्के मते मिळाली होती. 2020 मध्ये हे प्रमाण 54 टक्क्यांपर्यंत वाढले. दुसरीकडे, 2013 मध्ये काँग्रेसला 25 टक्के मते मिळाली होती, जी 2020 मध्ये फक्त 4 टक्के झाली. भाजपकडे अजूनही सुमारे 35 टक्के मते आहेत. अशाप्रकारे, काँग्रेस आणि आप यांना वेगवेगळे लढल्यामुळे नुकसान झाले.
राहुल आणि केजरीवाल एकत्र का आले नाहीत?
लोकसभा निवडणुकीनंतर, आप नेते गोपाल राय आणि दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे सांगितले होते आणि दिल्ली विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काँग्रेसला 5 ते 10 जागा हव्या होत्या, पण केजरीवाल यांनी त्यावर असहमती व्यक्त केली. त्यांनी काँग्रेससोबत निवडणूक युती करणार नसल्याचेही स्पष्ट केले. एवढेच नाही तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.
ADVERTISEMENT
