राजेंद्र राऊत म्हणाले, अकलूजच्या चौकात विजयी सभा घेणार, आता मोहिते पाटलांंचं प्रत्युत्तर

Dhairyasheel Mohite Patil : डीसीसी बँकेवरुन होत असलेल्या आरोपांना अकलूजमध्ये विजयी सभा घेऊन उत्तर देणार, असं म्हणत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांना आव्हान दिलं होतं. आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

Dhairyasheel Patil

Dhairyasheel Patil

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 08 Jun 2026, 01:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजेंद्र राऊत म्हणाले, अकलूजच्या चौकात सभा घेणार,

point

आता धैर्यशील मोहिते पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

Dhairyasheel Mohite Patil reply rajendra raut , सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले‌ म्हणूनच मोहिते पाटील आणि आमदार दिलीप सोपल माझ्या विरोधात काम करत आहेत, असा आरोप महायुतीचे सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला होता. तसेच, निकालानंतर अकलूजच्या चौकात सभा घेऊन मोहिते पाटलांकडून होत असलेल्या आरोपाला जरुर उत्तर देणार आहे, असे चॅलेंजही राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, राऊतांच्या चॅलेंजला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. दोन्ही नेते काय म्हणाले? जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

हेही वाचा : जरांगे समर्थक महिला थेट हाकेंना भिडली, रस्त्यावरील राड्याचा व्हिडीओ

राजेंद्र राऊत काय म्हणाले होते?

राजेंद्र राऊत म्हणाले, मी माझी भूमिका प्रामाणिकपणे मांडली आहे. मी शेतकऱ्याची बँक वाचवण्याचा प्रयत्न केला. या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचे जे सदस्य होते. त्यामध्ये राजन पाटील होते. बबनदादा शिंदे यांनी त्यांचं कर्ज भरलेलं आहे. संजय शिंदे यांनी भरलेलं आहे. जी मंडळी त्यामध्ये होती, ती सगळीच माझ्या बरोबर आहेत. विरोधात कोण आहे? मला सांगा.. यामध्ये माळशिरस आणि आमच्या बार्शीचा मुद्दा आहे. हे दोनच मुद्द आहेत. आणखी डीसीसीचा एक आहे. डीसीसीचा आणि या मतदानाचा काय संबंध आहे? यातील कोणी कर्ज घेतलेली मंडळी आहेत का? मी कधीच डीसीसीचं कर्ज घेतलं नाही. सोसायटीमध्ये माझं मतदान असावं, यासाठी 1 लाख घेतो आणि 1 लाख भरतो. मी त्या बँकेचं कधीच कर्ज घेतलं नाही. सगळ्यांना जीवनात कर्ज घ्यावं लागतंय. मात्र, मी घेतलेलं कर्ज फेडतो. सहकार चळवळ जिवंत राहिली पाहिजे. ती आपल्या जुन्याजाणत्या लोकांनी यशस्वीपणे चालवलेली आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी एखाद्या संस्थेला उद्धवस्त करायचं... ही प्रथा परंपरा चुकीची सुरु होती. त्यामुळे मी कोर्ट-कचेरी केली. आवाज देखील उठवला. ज्यांना पैसे भरायचे नव्हते, त्यांना याचा शॉक बसलेला आहे. मला या सर्व आरोपांचं उत्तर देण्यासाठी मर्यादा आहेत. निकाल लागल्यानंतर मी अकलूजच्या चौकात सभा घेऊन देणार आहे, असं आव्हानही राजेंद्र राऊत यांनी दिलं. 

हेही वाचा : Astrology : आजच्या दिवशी उत्साह, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील

धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय?

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, लोकशाही आहे, त्यांचं अकलूजमध्ये स्वागत आहे. यापूर्वी अनेक मोठ्या नेतेमंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत. अकलूज हे विचारवंत गाव आहे. लोकशाही मार्गाने यावं, त्यांना काय करु वाटतंय? ते करावं. आमचं ना म्हणणं नाही. यापूर्वी प्रमोद महाजन साहेबांची सभा झालेली आहे. पवार साहेबांची सभा झालेली आहे. जुनं सागायचं झालं तर..  देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची सभा देखील झालेली आहे. अकलूजला या गोष्टी नव्या नाहीत. अनेक पक्षाचे अनेक नेते अकलूजमध्ये सभा गाजवून गेले असतील. मग आमच्या विरोधातील असो किंवा समर्थनातील.. अकलूज नेहमी सर्वांचं स्वागत करतं. 

पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, मतदारांना त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे. त्यांना हक्काचा निधी मिळायला हवा. त्यांना आम्ही गंभीरपणे पाठिमागं उभारण्याचे आश्वासन देतोय. माझ्या उमेदवारांचे मतदार हे अदृश्य शक्ती आहेत. आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत, आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्यावर ही निवडणूक लढतोय. कोणाला कुठल्या गोष्ट न बोलता लागत असतील तर आम्ही जबाबदार नाहीत. एवढ पाशवी बहुमत आहे, तरी घाबरून का पळत आहेत? त्यांना त्यांच्या मतदारांवर विश्वास नाही, असं दिसतंय.. मी सर्व मतदारांना भेटतोय. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. भरपूर भेटी झाल्या, आजही घेणार आहे. सर्वांबरोबर आमच्या सकारात्मक बैठका सुरु आहेत, असंही मोहिते पाटील यांनी नमूद केलं.