मुंबई: शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाताना तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? असा सवाल विचारत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. याचवेळी त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कशी मदत पोहचवली हे देखील त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
'या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे. शेतकऱ्यांचं दु:ख आणि अश्रू पुसण्याचं काम शिवसेना करते आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात. पण त्या फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनाश्यक वस्तू, 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्या. अगदी गहू, तांदूळ, डाळ साखरपासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेटपासून सगळं दिलंय.'
'तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले.'
'अरे तुमचे फोटो लावून आमचे कार्यकर्ते मोठ्यामोठ्या आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना. तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. पण तो लावतात कार्यकर्ते.. परंतु त्याच्यावर एवढी टीका..'
हे ही वाचा>> तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
'फोटोग्राफरला काय दिसणार फोटोशिवाय. फोटोच दिसणार ना.. आणि म्हणून काही लोकं गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून.. पण आम्ही एकनाथ शिंदे जायच्या आधी मदतीचे ट्रक गेले, मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागात साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्या आहेत.'
'काही लोकं हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करतायेत. तुम्हाला काय अधिकार आहेत? मी एवढंच सांगतो की, यांचे दौरे म्हणजे खुद को चाहिए काजू-बादाम, पानी मैं उतरे तो सर्दी-जुकाम.. ही अशी अवस्था आहे.'
हे ही वाचा>> क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल
'मला कोणी तरी फोन केला होता. म्हणाले सगळे लोकं तिथं चिखलात बसले आहेत. शेतकऱ्यांचा आयुष्याचा चिखल झालाय. पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणू रॅम्प लावलाय.. रॅम्प वॉक सुरू आहे, रॅम्प वॉक..'
'कुठेही गेले की, माझे हात खाली आहेत, रिकामे आहेत.. माझ्या हातात काही नाही.. आता काही नाही, कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिलं. आतापण नाही दिलं, उद्यापण देणार नाही. द्यायला दानत लागते दानत.. या एकनाथ शिंदे दोन्ही हात देणारे आहेत देणारे.. ही लेना बँक नाही देना बँक आहे देणारे आहेत.'
'एकनाथ शिंदेचे देणारे हात आहेत, कधी म्हणाला नाही की माझे हात रिकामे आहेत. कधी नाही बोलला.. नेहमी आतापर्यंत देण्याचं काम केलंय. माझे दोन हातच नाहीत हे तुमचे लाखो शिवसैनिकांचे हात पण माझेच आहेत.'
'संपत्तीचा मोह आम्हाला नाही, प्रॉपटी तुम्हाला पाहिजे ती घ्या.. मला म्हणाले तुम्ही कशाकशावर क्लेम करणार आहात? बोललो बिल्कुल कशावरही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली.
ADVERTISEMENT
