मुंबई: मुंबईत ठाकरेंचं काय होणार? याकडे सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. ज्या शिवाजी पार्कवरून ठाकरे ब्रँडची सुरुवात झाली त्याच शिवाजी पार्कवर उद्या (11 जानेवारी) ठाकरे बंधूंची ऐतिहासिक सभा होणार आहे. कारण पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधू हे मुंबईतील शिवाजी पार्कवर एकत्र जाहीर सभा घेणार आहेत. पण त्याधी शिवसेना पक्षप्रमुख यांची अत्यंत स्फोटक आणि रोखठोक अशी मुलाखत आपल्याला मुंबई Tak वर पाहता येणार आहे. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी उद्धव ठाकरेंची ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंसोबतची युती आणि ठाकरे ब्रँडचं मुंबईतील अस्तित्व या सगळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी अत्यंत रोखठोक अशी मुलाखत मुंबई Tak ला दिली आहे. ही लढाई ठाकरेंच्या अस्तित्वाची आहे की, मराठी माणसाच्या अस्तित्वाची याबाबत देखील उद्धव ठाकरेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना UBT आणि मनसे या पक्षांच्या पदरात मोठं अपयश आलं. त्यामुळे ज्या मुंबईतून ठाकरेंचा उदय झाला त्याच मुंबईची सत्ता आता टिकविण्याचं मोठं आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर आहे. एकीकडे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष समोर असताना हे आव्हान अधिक कठीण होऊन बसलं आहे. कारण त्याचवेळी दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला देखील ठाकरेंना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे मराठी मतदारात फूट पडण्याची मोठी शक्यता आहे. याच मुद्द्यावर देखील उद्धव ठाकरेंनी नेमकं भाष्य केलं आहे.
आतापर्यंत जवळजवळ 25 वर्ष मुंबईकरांनी शिवसेनेला मुंबईची सत्ता दिली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवून सत्ता टिकविण्याचं अत्यंत कठीण आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे यंदा मुंबईकर नेमकं काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत त्यांच्या मुंबईतील 'मातोश्री' या निवासस्थानी पार पडली. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी उद्धव ठाकरेंशी गप्पा मारताना त्यांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं आहे. तसंच शिवसेना UBT पक्षाची आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका असेल नेमकं राजकारण कसं याबबातही अनेक प्रश्न विचारले. ज्यावर उद्धव ठाकरेंनीही खास त्यांच्या शैलीत उत्तरं दिली.
कुठे आणि कधी पाहता येईल उद्धव ठाकरेंची महामुलाखत?
शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महामुलाखत ही आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल. ही संपूर्ण मुलाखत आपल्याला उद्या (11 जानेवारी 2026) सकाळी 11.00 वाजता पाहता येईल.
पाहा उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा Super Exclusive प्रोमो
ADVERTISEMENT











