तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई तक

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray : तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का?

point

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, Mumbai : "मुंबईत अनेक योजना राबवल्या. एकनाथ शिंदेंचे दोन्ही हात देणारे आहेत. नेहमी देण्याचं काम केलंय. लाखो शिवसैनिकांचे हात देखील माझे आहेत. समोर बसलेले लोक माझी संपत्ती आहे. मला म्हणाले, तुम्ही कशा कशावर क्लेम करणार? बाळासाहेबांचे विचार हिच आमची संपत्ती आहे. 60 ते 70 लोकांचे प्राण वाचवले. कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी छोटे बाळ घेऊन आली. तिने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली म्हणून तिचं नाव दुआ असं ठेवलंय. तुम्ही काय केलं? तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का?", असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. ते गोरेगाव येथील शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्यातून बोलत होते. 

हेही वाचा : क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे, उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक अफवा पसरवतात. पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पाच कोटी लोकांच्या दारी जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला. काम केलं म्हणून निवडणुकीत लँड स्लाईड विक्टरी मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत केली जाईल. पीएम केअर योजनेतून पैसे द्या म्हणाले. ती योजना कोविडसाठी होती. पीएम मोदींनी शेतकरी सन्मान योजनेत आणि आपत्तीमध्ये 46 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले.ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत होता, तेव्हा अमित शाहांनी 10 हजार कोटी माफ केले. काँग्रेसने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटी दिले. मोदीजींच्या सरकारने पाच पट दिले म्हणजे 10 लाख रुपये दिले. 76 हजार कोटींचं वाढवण बंदर आहे. मेट्रो तीनचं उद्घाटन होत आहे, त्यालाही मंजुरी दिली. 

मराठी माणसाला हद्दपार कोणी केल? कोणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? कोणी माईचा लाल आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई मराठी माणसाचीच राहणार आहे. आता निवडणुकीसाठी तुम्हाला प्रेम उतू आलंय. तुमचं कोणी ऐकणार नाही. विश्वासही ठेवणार नाही. मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. मुंबईतून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा परत आणल्याशिवाय राहाणार नाही, असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp