BJP: ‘तुमची पदं भाजपमुळे हे विसरू नका’, मंत्री उदय सामंत-दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं

मुंबई तक

21 May 2023 (अपडेटेड: 21 May 2023, 07:16 AM)

BJP: नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना आठवण करुन देतो की, त्यांची पदं भारतीय जनता पक्षामुळे आहेत. अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सुनावले आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

dont forget your positions because of bjp spokesperson ajit chavan gave harsh words to ministers uday samant and dada bhuse

dont forget your positions because of bjp spokesperson ajit chavan gave harsh words to ministers uday samant and dada bhuse

follow google news

BJP Nashik: नाशिक: ‘नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना आठवण करुन देतो की, त्यांची पदं भारतीय जनता पक्षामुळे (BJP) आहेत.’ अशा थेट शब्दात भाजपचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण (Ajit Chavan) यांनी सुनावलं आहे. याबाबतची फेसबुक पोस्टच त्यांनी शेअर केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र ही सत्ता भाजपच्या पाठिंब्यावर आहे याची आठवण भाजपच्या सह-मुख्य प्रवक्त्याने थेट कॅबिनेट मंत्र्यांनाच करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील कुरूबुरी देखील चव्हाट्यावर आल्या आहेत. (dont forget your positions because of bjp spokesperson ajit chavan gave harsh words to ministers uday samant and dada bhuse)

हे वाचलं का?

भाजप सह-मुख्य प्रवक्त्याने दोन दिग्गज मंत्र्यांना का सुनावलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काल (20 मे) नाशिकमध्ये औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळा पार पडला. हा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील भाजपच्या आमदार सीमाताई हिरे यांना एका व्यक्तीचा धक्का लागून त्या खाली पडल्या. मात्र, तरीही या घटनेची दखल न घेता उद्घाटनाचा कार्यक्रम हा पुढे सुरुच राहिला. ज्यामुळे आता भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत देखील पोहचवलं जाईल असंही अजित चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना सांगितलं.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

थेट कॅबिनेट मंत्र्यांना त्यांची पदं ही भाजपमुळे असल्याची जाहीर आठवण भाजप प्रवक्त्याने का करुन दिली याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पण ही संपूर्ण घटना काय आहे याबाबत भाजप सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी घडलेल्या प्रकाराच्या व्हिडीओसह एक फेसबुक पोस्टच शेअर केली आहे. ती पोस्ट जशीच्या तशी:

सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक किती उथळ झाले आहेत याचा अतिशय धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्या सीमाताई हिरे यांना एका अतिशय अपमानस्पद प्रकाराला सामोरे जावे लागले सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ज्यांचा वावर अतिशय सौजन्यशील असतो. नाशिकच्या लोकप्रतिनिधींमध्ये सीमाताई या अतिशय सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्वसामान्यांना आपल्या वाटतात. अशा व्यक्तीचा झालेला अपमान नाशिककरांच्या जिव्हारी लागला आहे.

 

हे ही वाचा >> त्र्यंबकेश्वर वाद : ‘हे कोत्या वृत्तीची लोक’, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर बरसले

 

औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धनंजय बेळे या कायम मिरवून घेण्यासाठी पुढे-पुढे करणाऱ्या व्यक्तीने सीमाताईंना मागून धक्का दिला आणि त्या पडल्या हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनावधानाने असं होऊ शकतं, कुणाचाही कुणालाही धक्का लागू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे…पण आपल्यामुळे कुणीतरी पडलं त्याची माफी मागणं हे सौजन्य आहे ते साधं सौजन्यही न दाखवता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सरसवून फोटो काढून मिरवून घेण्यात हे धनंजय बेळे पुन्हा एकदा व्यस्त झाले…

या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे या दोघांनीही आपल्या एका लोकप्रतिनिधी भगिनीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असताना तातडीने तो कार्यक्रम थांबवून आधी दखल घेऊन. त्यांची विचारपूस करायला हवी होती. मात्र असं न करता ताई तिथून निघून गेल्या तरीदेखील त्याची दखल न घेता उद्घाटन सोहळा पार पाडणाऱ्या मंडळींचा मी जाहीर निषेध करतो सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना लोक आपल्याला पाहत असतात नाशिककरांनी तर धनंजय बेळे या स्वयंघोषित उत्सव मूर्तीवर बहिष्कार घालायला हवा इतकी संस्कारहीन संवेदनाहीन वागणूक नाशिककरांना या व्यक्तीची दिसली आमदार सीमाताई हिरे या आमदार आहेत म्हणून नाही तर या ठिकाणी कुणीही माणूस असता तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसा बरोबर देखील असं जर झालं तर ते अतिशय वाईट झालं असतं.

मात्र समस्त नाशिककरांच्या आदरास पात्र असलेल्या लाखो मतांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा अपमान होतो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्री बघत बसत असतील तर व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील घसरणारा हा स्तर पाहून वाईट वाटत आहेच, पण पक्षाचा सह मुख्यप्रवक्ता म्हणून या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेऊन मी याचा निषेध व्यक्त करतो.

हे ही वाचा >> आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत ही नाराजी पोचवली जाईल आणि त्यांनाही झालेल्या प्रकार आवडेल असं मला वाटत नाही राहिला प्रश्न धनंजय बेळे या व्यक्तीचा या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या या या संस्कारहीन आणि मिरवून घेण्याची हौस असणाऱ्या माणसावर नाशिककरांनी बहिष्कार घालण्याची गरज आहे.

    follow whatsapp