Eknath Shinde : 50 कोटी ते... शेवटच्या दिवशी CM शिंदे ठाकरेंवर बरसले!

हर्षदा परब

01 Mar 2024 (अपडेटेड: 01 Mar 2024, 05:59 PM)

eknath shinde speech : विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही मुद्द्यांवर भाष्य केले.

एकनाथ शिंदे यांचे विधानसभेतून वार

Eknath shinde recites uddhav Thackeray.

follow google news

Eknath Shinde Speech In Assembly : विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांचा प्रमुख रोख उद्धव ठाकरे यांच्यावरच दिसला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घटनांवर बोट ठेवत शिंदे ठाकरेंवर बरसले. (CM Eknath Shinde Slams to uddhav Thackeray)

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे विधानसभेत काय म्हणाले... महत्त्वाचे मुद्दे

1) "विरोधी पक्षाने दाखल केलेला २९३ प्रस्ताव जो आहे, तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहापानावर बहिष्कार टाकला होता, तो प्रस्तावही वाचला. गेल्या वेळी अंतिम आठवडा प्रस्ताव होता, तोही वाचला. एकच असतं ते... एकच स्क्रिप्ट... एकच ड्राफ्ट... सगळं एकच. आणि एकाच स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना. त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत."

2) "सरकार चुकत असेल, तर नक्की टिका करा. पण, मुद्दा नसेल, तर अपशब्द वापरायचे. आरोप करायचे. मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचे. थयथयाट करायचा. पक्ष चोरला म्हणून... चिन्ह चोरलं म्हणून... हे रोज सुरू आहे. नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात जन्माला येतेय. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारे कांगावा करणे हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकला, विचारधारा विकली. सत्तेसाठी सगळं केलं."

3) "सारखं चोरलं... चोरलं म्हणत रडायचं, ही कुठली भूमिका आहे. अरे मर्दासारखे बोला ना आणि जाहीरपणे बोला. आम्ही जे देतोय ते जाहीरपणे देतोय. शेतकरी, लोकांपर्यंत पोहोचवतो. आम्हाला खोके-खोके म्हणणारे... त्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतलेत. त्याचीच आता चौकशी सुरूये. शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना आमच्याकडे आहे... ते आता खोके पुरत नाही, म्हणून कंटेनर... हे मी नाही, कुणीतरी बोललं आहे."

हेही वाचा >> शिंदे-फडणवीसांनी पवारांचं निमंत्रण नाकारलं, पण अजितदादा...

4) "अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यात धन्यता मानतात. काही लोक सभागृहात न बोलता बाहेर मीडियात जास्त बोलण्यात आनंद समजतात. विधिमंडळाचे कामकाज घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर तेही केलं असतं."

5) "काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात. तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडे संभालते है, असे म्हणणारेही काही लोक आहेत. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचे काही जण म्हणायचे. फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय."

6) "राज्यात आणि देशात मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. त्याचमुळे अजित पवारही आमच्यासोबत ज्वॉईन झाले आहेत सरकारमध्ये. अशोकराव आलेत. आणखी काय काय होईल. याची चिंता तुम्हाला आहे. त्यामुळे सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला नेता, दुपारी आपल्यासोबत राहील की नाही, याची गॅरंटी नाही."

7) "आम्ही कुणालाही बोलवत नाही. निमंत्रण देत नाही. पण, मोदींच्या गॅरंटीमुळे लोक येत आहेत. विकासाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण, विकासाचा अटल सेतु आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने एक्स्प्रेस वे वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केलाय आणि करतोय."

8) "आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तुम्ही फक्त त्यांना पोकळ आश्वासने दिली. पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी स्थिती आहे."

9) "कुणीतरी तुमच्यातीलच लोकांनी विचार मांडले होते की, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार. त्यांना कसे प्रश्न समजणार आणि उमजणार, कसे प्रश्न सोडवणार?"

हेही वाचा >> ''आम्ही शरद पवारांनाच साथ देणार'', अजित पवारांविरोधात सख्ख्या पुतण्याने थोपटले दंड

10) "अडीच घरं चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्य सरकारने सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. आम्ही सुरू केले."

11) "राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचे म्हटलं. मी गुन्हेगारी आणि गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही. दुर्दैवी घटनांचं राजकारण करणं त्यापेक्षा जास्त दुर्दैवी आहे. ज्यांच्या कार्यकाळात खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले. पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी खंडणीखोरी व्हायची, ते रॅकेट पकडलं."

12) "साधूचं हत्याकांड झालं. हनुमान चालीसा ज्यांनी म्हटली, त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. देशद्रोहाचं कलम लावलं. केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उचललं. खासदार-आमदारांना जेलमध्ये टाकलं. पत्रकारांना टाकलं, अर्णब गोस्वामीला टाकलं. कंगना रणौतचं घर तोडायला महापालिकेचे ८५ लाख रुपये खर्च केले. हे काय अंहकार आहे. देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केले. यांना जिवा महालाचं स्मारक आठवलं नाही. ते आम्ही केलं."

13) "पेडलर... ड्रग्जच्या नांग्या ठेचल्या. शाळांच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील, ड्रग्ज विकत असतील. मुलांचं जीवन बरवाद करत असतील, तर बुलडोजरने तोडून टाका. १ हजार १२०० बांधकामं तोडून टाकली. यामध्ये कुणाचा थयथयाट होतोय, नाईट लाईफवाल्यांचा."

हेही वाचा >> NCP ची बँक खाती अजित पवार गटाच्या ताब्यात, मुंबईत पक्ष कार्यालयावरही दावा

14) "साडी वाटपऐवजी शस्त्र वाटा. पण, या महाराष्ट्रातील आया बहिणी सुखरुप आहे. रात्री अपरात्री निर्भयपणे फिरतात. एखादी महिला भगिनी अडचणीत आली, तर पाच मिनिटात मदत पोहोचली पाहिजे अशी यंत्रणा केली. मी अजित पवारांना म्हणालो होतो की, गृह खात्याचं काहीतरी करा आणि झालंच ते."

15) "उद्योग पळवले. उद्योग चालले. किती कोल्हेकुई सुरू आहे. त्यावेळी का पळाले. उद्योगपतींच्या खाली बॉम्ब ठेवतात. जिलेटिन ठेवल्यानंतर जेव्हा पोलिसांवर आरोप झाला, तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले की, अरे तो वाझे काय लादेन आहे? नंतर निघाला तोच लादेन. त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडे. कसे लोक राहतील इकडे?"

16) "या राज्यात येऊ लागले आहेत. दावोसला एक लाख ३७ हजारांचे सामजंस्य करार झाले. ८० टक्के कार्यवाही सुरू झालीये. यावेळस ३ लाख ७३ हजार कोटींचे सामजंस्य करार झाले. ग्रीन हायड्रोजनला प्रमोट केलं आहे. आपलं पहिलं राज्य आहे. साडेतीन चार लाख लोकांना रोजगार मिळणार आहे."

    follow whatsapp