Operation Sindoor : 'मरकज सुभान अल्लाह' हे पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूरच्या बाहेरील एनएच-5 (कराची-तोरखम महामार्ग) वर कराची जवळ आहे. हे 15 एकर क्षेत्रात पसरलेलं जैश-ए-मोहम्मद (JEM) चं मुख्य प्रशिक्षण आणि प्रचार केंद्र आहे. हे केंद्र जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय आहे. 14 फेब्रुवारी 2019 च्या पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी कटांशी या लोकेशनचा थेट संबंध आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?
मरकज सुभान अल्लाह का महत्वाचं?
- स्थान : एनएच-5, कराची मोर, बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान.
- स्थापना: 2015 मध्ये पाकिस्तानच्या प्रांतीय आणि संघीय सरकारांच्या पाठिंब्यानं आणि आखाती, आफ्रिकन देशांमधून (यूकेसह) उभारलेल्या निधीने हे तयार केलं.
- मुख्य कार्य : जैश-ए-मोहम्मदसाठी तरुणांना प्रशिक्षण देणं, विचारसरणीचा प्रसार करणं आणि दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे.
- क्षमता : या संकुलात 600 हून अधिक कार्यकर्ते (दहशतवादी) राहतात आणि प्रशिक्षण देतात.
या ठिकाणाची प्रमुख वैशिष्ट्य
- निवासस्थान: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख नेता, मौलाना मसूद अझहर: जैशचा प्रमुख (सध्या इस्लामाबाद/रावळपिंडी येथे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात्मक ताब्यात)
- मुफ्ती अब्दुल रौफ असगर: जैशचा डी-फॅक्टो प्रमुख.
- युसूफ अझहर (उस्ताद घोरी): मसूद अझहरचा मेहुणा आणि जैशच्या सशस्त्र शाखेचा प्रमुख.
- मौलाना अम्मार: मसूद अझहरचा भाऊ.
- मौलाना तल्हा सैफ: मसूद अझहरचा धाकटा भाऊ.
- मोहम्मद अब्दुल्ला बिन मसूद: मसूद अझहरचा मुलगा.
प्रशिक्षण सुविधा
- शस्त्र प्रशिक्षण: रायफल, रॉकेट लाँचर आणि स्फोटकांचे प्रशिक्षण. शारीरिक प्रशिक्षणासाठी व्यायामशाळा (मार्च २०१८ पासून), स्विमिंग पूल (जुलै २०१८ पासून) आणि खोल पाण्यात डायव्हिंग कोर्सेस.
- धार्मिक प्रशिक्षण: 2022 च्या मध्यापासून मुख्य प्रशिक्षक असलेले मौलाना रफिकउल्लाह कट्टरपंथी विचारसरणी शिकवतात.
- इतर प्रशिक्षण: 6 दिवसांचे धनुर्विद्या प्रशिक्षण, घोडेस्वारी (मे 2022 पासून घोडेस्वारी आणि घोडेस्वारीचे मैदान) आणि 'अल हिजामा' केंद्र (2019 पासून प्रेशर कपिंग थेरपी).
- दहशतवादी कारवाया : 2019 च्या पुलवामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यातील आरोपींचं प्रशिक्षण केंद्र मरकझ सुभान अल्लाह होते.
ADVERTISEMENT
