IAF on Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हल्ले प्रतिहल्ले झाले. त्यानंतर काल दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवत युद्ध थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरीही पाकिस्तानकडून काही कुरापती झाल्या होत्या. त्यातच आता भारतीय वायू सेनेकडून एक मोठी प्रतिक्रिया आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> "पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाला...", ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावरून संतप्त ओवैसींचे 4 सवाल
शस्त्रसंधीबाबत भारतीय हवाई दलाचं एक मोठं विधान समोर आलं आहे. भारतीय हवाई दलाचं म्हणणं आहे की, हे ऑपरेशन अजूनही चालू आहे. पुढच्या काही वेळात याबद्दलची माहिती दिली जाईल. हवाई दलानं ही माहिती सोशल मीडिया हँडल एक्स वर दिली आहे.
ऑपरेशन सुरू आहे हे सांगताना हवाई दलाने म्हटलं की, माहिती देताना, भारतीय हवाई दलाने लिहिले की, भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमधील आपली कामं अचूकता आणि योग्य पद्धतीनं पूर्ण केली आहेत असं हवाई दलानं म्हटलं.
हे ही वाचा >> चुकूनही पाकिस्तानात जाणार नाही, इंग्लंडचा खेळाडू एअरपोर्टवर ढसा ढसा का रडला?
देशाच्या हितामध्ये अत्यंत विचारपूर्वक पद्धतीनं ही सर्व ऑपरेशन्स केली गेली. अजून ऑपरेशन सुरू असल्यानं योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल.दरम्यान,  भारतीय हवाई दलानं चर्चा टाळण्यासाठी सविस्तर माहिती देणंही टाळलेलं आहे.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









