'...तर 30 मे पासून आमरण उपोषण' मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

'मराठ्यांनी पिकांचे नुकसान करू नका. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. कोणाच्या मिरचीला, उसाला हात लावू नका. आंदोलन अंतरवाली मधे शांततेत होणार. 30 मे रोजी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार' असं जरांगेंनी सांगितलं. 

Manoj Jarange Patil Press Conference

Manoj Jarange Patil Press Conference

मुंबई तक

• 12:24 PM • 16 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'...तर 30 मे पासून आमरण उपोषण'

point

मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange Patil Press Conference : अंतरवाली सराटीत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला आंदोलनाचा तीव्र इशारा दिला. ते म्हणाले की, 'मराठ्यांनी पिकांचे नुकसान करू नका. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. कोणाच्या मिरचीला, उसाला हात लावू नका.आंदोलन अंतरवाली मधे शांततेत होणार. 30 मे रोजी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहे.'

हे वाचलं का?

'आमचे प्रमाणपत्र तुम्हीच रोखलेत'

यापुढं बोलताना जरांगे म्हणाले की, 'अधिकाऱ्यांना जर विचारलं की कुणबी प्रमाणपत्र हैदराबाग गॅझेटियरनुसार द्या, तर ते म्हणतात की सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? तर देवेंद्र फडणवीस साबेहच. दुसरा कोणी नाही. फडणीवसांनी चार-पाच महिन्यांपूर्वी अधिवेशनात भाषण केलेलं. यात ते म्हटले की मंत्र्याला किंमत नाही. मुख्यमंत्रीच सर्व असतो. मग आमचे प्रमाणपत्र तुम्हीच रोखलेत.'

हे ही वाचा : 'सध्या फक्त ट्रेलर दाखवलाय..' लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुण्यातील मॉलवर गोळीबार, कुणाला दिली वॉर्निंग?

'फडणवीस साहेब तुम्ही गोरगरिबांची मनं जिंका'

हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढला. त्याची अंमलबजावणी सरकारनं केली. या गॅझेटियरनुसार 308 कुणबी प्रमाणपत्र निघाली असं सरकारनं जाहीर केलंय. याचा अर्थ असा की हैदराबादचा जीआर लागू झाला, त्याची अंमलबजावणी झाली. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाहीत? जो स्थानिक चौकशी अहवाल तयार केलाय त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजेत. तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब तुम्ही गोरगरिबांची मनं जिंका. आम्हाला काय करायचं सत्तेचं? मला त्याची हाव नाही. माझ्या समाजालाही नाही. पण आमची लेकरं नाही मरु देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही तर तुमच्या पन्नास पिढ्याही आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लागू देणार नाही. मराठ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले की, 'मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र देण्यापासून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांना व्हॅलिडिटी द्यायची. तेही आंदोलनाच्या तारखेच्या आत. नसता आंदोलन भयानक होणारय. दुसरा भाग ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या. ती सगळी प्रमाणपत्रं द्या. त्या नोंदी ग्रामपंचायतींना लावा. एकनाथ शिंदे साहेबांनी प्रमाणपत्रं दिली. तसंच फडणवीस साहेबांनी करावं.'

हे ही वाचा : धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या

सातारा संस्थानातील जीआर विषयी काय म्हणाले?

सातारा संस्थानातील जीआर विषयी बोलताना ते म्हणाले की, 'सातारा संस्थानचा जीआर तुम्ही का काढत नाही? तुम्ही एक महिन्यात जीआर काढतो म्हटला होता. आठ महिने झाले. आता मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत. सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. 1994 साली काढलेल्या जीआरच्या धर्तीवरच तो जीआर काढावा. सारथीच्या 80 हजार मुलांच्या शिष्यवृत्त्या थकल्या आहेत. कावाटोळं करता आमच्या पोरांचं? मला माहिती मिळाली ती खरी का खोटी माहिती नाही. महामंडळाचे 1600 ते 1800 करोड रुपये थकलेत. मेली ना पोरं आमची कर्जबाजारी होऊन. इकडं भाषणात देवेंद्र फडणलीस साहेब सांगतात, आम्ही मराठ्यांना उद्योगपती करत आहोत.'

यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'ओपन मध्ये आता ओबीसीला जागा भरता येणार नाही. मराठे आरक्षणात आल्याने सरकारने हा जीआर काढला. 50 टक्क्यातल्या 30 टक्के जागा ओबीसींनी खालल्या. आधी जर हा जीआर काढला असता तर ओबीसींनी आमच्या जागा खाल्ल्या नसत्या. 28 मे ला राज्यातले मराठा अभ्यासक, समन्वयक, संघटनेचे संस्थापक असतील सगळ्यांनी अंतरवाली सराटीत या. हा जीआर चांगला आहे की नाही यावर आपण चर्चा करू.'