Devendra Fadnavis on Eknath Shinde, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतील वाद सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी वारंवार दिल्ली दौरे करतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबई Tak'च्या 'बैठक' कार्यक्रमात बोलताना त्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!
शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दिल्लीत कुठलीही भांडणे सुटत नाहीत. दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलंय की, या छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातच करायच्या आहेत. दिल्लीला फार काम आहेत. दिल्ली या गोष्टी एंटरटेन करत नाही. हे जे काही असतं त्याचे निर्णय महाराष्ट्रातच होतात. हा मेसेज सगळीकडे योग्यपणे पोहोचलेला आहे."
हेही वाचा : Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही', फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!
सातारा जिल्हा परिषदेच्या वादावर फडणवीसांचं भाष्य
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सातारा जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या महायुतीतील वादाबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तीन पक्षच निवडून आलो. बाकी उबाठा असेल पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या तिघांचा मिळून एक आला. त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होती. आम्ही युतीत नव्हतो. आम्ही स्वतंत्र लढलो. आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून आला. आमचे सभापती निवडून आले. आता त्यामध्ये स्थानिक स्तरावर काही कुरबुरी झाल्या त्याचा राग पालकमंत्र्यांना आला. पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी बोलले. शेवटी माणसं आहेत रागवतात ते बोलले.. पण त्याच्यानंतरची परिस्थिती बघा. परवा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार होता. तिन्ही पक्ष आम्ही एकत्रित होतो. तिन्ही पक्षाच्या सगळ्या लोकांनी मतदान केलं आणि विजय आमचा झाला. म्हणजे याचा अर्थ काय कुरबुरी झाल्या त्या संपल्या. निवडणुकीच्या राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. काही जण पराभूत होतात.
ठाकरेंच्या खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश का झाला नाही?
"हे खासदार मूळचे शिवसेनेचे असल्यामुळे त्यांना शिवसेनेतच म्हणजेच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, अशी महायुतीची भूमिका होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यासाठी पक्षाची दारं उघडली नाहीत", असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT











