Ncp :जयंत पाटलांना हटवलं! राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदी सुनील तटकरे

मुंबई तक

03 Jul 2023 (अपडेटेड: 03 Jul 2023, 12:29 PM)

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदावरून आता जयंत पाटील यांना हटवण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना केली आहे.जयंत पाटील यांना हटवून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यता आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

jayant Patil removed and sunil tatkare is maharashtra state president ncp working president praful patel announce

jayant Patil removed and sunil tatkare is maharashtra state president ncp working president praful patel announce

follow google news

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदावरून आता जयंत पाटील यांना हटवण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना केली आहे.जयंत पाटील यांना हटवून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यता आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर काही संघटनात्मक निर्णय़ घेण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भूजबळ आणि सुनील तटकरे यांनी पत्रकार परीषद बोलावून याबाबत घोषणा केली आहे. (jayant Patil removed and sunil tatkare is maharashtra state president ncp working president praful patel announce)

हे वाचलं का?

संघटनात्मक निवडणूका झाल्या नव्हत्या तरी देखील एक तत्काळ स्वरूपात जयंत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. आता जयंत पाटील यांना आम्ही त्या जबाबदारीतून मुक्त करतो. आणि सुनील तटकरे यांना नियुक्त केले आहे. सुनिल तटकरे यांनी तत्काळ आतापासूनच कामाला लागावे आणि कार्यभार सांभाळावा. जयंत पाटील यांनी संबंधित कागदपत्रे ही तटकरे यांनी द्यावी अशी सुचना देखील प्रफुल पटेल यांनी केली.अजित पवार यांची गटनेतेपदी तर अनिल भाई दास पाटील प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देखील प्रफुल पटेल यांनी दिली.

दरम्यान जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्या संबंधित पत्र देखील दिले आहे. यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की,कुठल्याही आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया हे कोणत्या पक्षाद्वारे होऊ शकत नाही. आणि निवडणूक आयोगाला देखील याचा अधिकार नाही आहे. हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांना असतो. याची एक लांब प्रक्रिया देखील आहे. ही प्रक्रिया पुर्ण केल्याशिवाय त्यावर निर्णय देता येत नाही, त्यामुळे पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

पक्षाच्या आमदारांनी अजित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून नियुक्त केले आहे. आणि अजित पवार पक्षाच्या वतीने जबाबदारी सांभाळतील असे देखील प्रफुल पटेल म्हणाले आहेत. तसेच अनिल पाटील यांना प्रतोदपदी नियुक्त केले आहेत. ते प्रतोदपदी आधीही होते, त्यांना याच पदावर कायम ठेवले आहे. याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना कळवले असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

 

    follow whatsapp