'माझ्या मुलीसोबत अश्लील...', 2976 व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या, बड्या राजकीय नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप!

Prajwal Revanna Rape Case Update :  कर्नाटकचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD) एचडी रेवन्ना यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींचा पुतण्या प्रज्ज्वल रेवन्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगलीय.

Prajwal Revanna Rape Case Update

Prajwal Revanna Rape Case Update

मुंबई तक

01 Aug 2025 (अपडेटेड: 02 Aug 2025, 09:17 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रज्ज्वल रेवन्नाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल

point

कोणी केला होता प्रज्ज्वल रेवन्नाचा व्हिडीओ व्हायरल?

point

महिलेनं केला होता गंभीर आरोप

Prajwal Revanna Rape Case Update :  कर्नाटकचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD) एचडी रेवन्ना यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींचा पुतण्या प्रज्ज्वल रेवन्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगलीय. 26 एप्रिल 2024 ला प्रज्ज्वल रेवन्नांचे महिलांसोबतचे 2976 अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले. या महिलांपैकी एका महिलेनं आरोप केला आहे की, प्रज्ज्वल रेवन्नाने 2019 ते 2022 दरम्यान अनेकदा त्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं. याच कारणामुळे विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी खासदार रेवन्नाला लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं. हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या.

हे वाचलं का?

प्रज्ज्वल रेवन्नाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल

रेवन्नाचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याने अनेक महिलांसोबत चुकीचं कृत्य केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं. दरम्यान, रेवन्नाने हे व्हिडीओ मॉर्फ्ड असल्याचं सांगत आरोपांचं खंडन केलं आहे. इतकच नव्हे, त्याने पोलिसांतही तक्रार दाखल केली. त्याचदरम्यान हासन निवडणुकीचं मतदान 26 एप्रिलला संपल्यानंतर रेवन्ना जर्मनीला गेला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोणी केला होता प्रज्ज्वल रेवन्नाचा व्हिडीओ व्हायरल?

या स्कँडलचा एक व्हिडीओ खासदाराने शूट केला होता, असा आरोप होता. हासन मतदार संघात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. प्रज्ज्वल रेवन्ना या व्हिडीओच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा. यानंतर एका महिलेनं रविवारी प्रज्ज्व रेवन्नावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात होलेनरसीपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. महिलेनं आरोप केला की, 2019 ते 2022 दरम्यान अनेकदा त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

हे ही वाचा >> पुण्यातील दौंड तालुक्यात दोन गटात तुफान राडा, पोलिसांचा फौजफाटा तैनात, एकमेकांच्या घरावर दगडफेक

महिलेनं केला होता गंभीर आरोप

महिलेनं असाही दावा केला होता की, 'प्रज्ज्व रेवन्नाने व्हिडीओ कॉलवर माझ्या मुलीसोबतही चुकीचं कृत्य केलं होतं'. तिच्यासोबत अश्लील बोलणं केलं. एवढच नाही, प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवन्ना यांनीही त्यांच्या पत्नीच्या अनुपस्थितीत लैंगिक शोषण केलं होतं. कुटुंबाच्या अन्य सदस्यांच्या जीवालाही धोका आहे, असंही महिलेनं म्हटलं. 

यावर प्रज्ज्वल रेवन्नाने म्हटलं, माझी बदनामी करण्याच्या हेतुने अशाप्रकारचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शनिवारी सकाळी ते जर्मनीला रवाना झाले. याचदरम्यान अनेक महिलांनी त्यांच्या कृत्याबाबत खुलासा केला.

हे ही वाचा >> मानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा आणि ATM कार्ड... मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं 'ते' रहस्य!

जुन्या मोलकरणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

दुसरी केस सीआयडीने रजिस्टर्ड केली. हा गंभीर आरोप जेडीएसच्या महिला कार्यकर्त्याने लावला होता. तिने म्हटलं होतं की, तिच्यासोबत अनेकदा चुकीचं कृत्य करण्यात आलं. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्ज्वल रेवन्नाला मागील 14 महिन्यांपर्यंत जेलमध्ये राहावं लागलं. प्रज्ज्वलच्या वकिलांनी त्यांना जामिन मिळवून देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, कोर्टाने प्रत्येक वेळी जामिन नामंजूर केला.

    follow whatsapp