Mumbai Tak Chavadi : "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

05 Apr 2024 (अपडेटेड: 05 Apr 2024, 11:34 AM)

Kirit somaiya Interview Uddhav Thackeray : किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करताना एक मोठा खुलासा केला.

किरीट सोमय्या यांची मुंबई Tak चावडीवर मुलाखत

किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस.

Google CTA

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्या यांची मुंबई Tak चावडीवर मुलाखत

point

उद्धव ठाकरेंविरोधात सोमय्या का आक्रमक झाले?

point

देवेंद्र फडणवीसांनी किरीट सोमय्यांना काय सांगितलेले?

Kirit Somaiya on Uddhav Thackeray : वेगवेगळ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. मुंबई Tak चावडीवर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना घेरण्याचे आदेश कुणी दिले होते आणि काय चर्चा झाली होती, याबद्दल भूमिका मांडली. 

हे वाचलं का?

भाजपचे नेते किरीट सोमय्या मुंबई Tak चावडीवर आले होते. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. याचवेळी त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी सविस्तर उत्तर दिले. 

सोमय्यांना उद्धव ठाकरेंना घेरायला कुणी सांगितलं?

'तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं की, मातोश्रीवर अटॅक करा? तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का?', असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, "एक गोष्ट सगळे मान्य करतात की, किरीट सोमय्या हा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. यात आलं सगळं उत्तर. माझ्या पक्षाने मला ज्या-ज्या वेळी जे-जे सांगितलं, ते मी केलं."

हेही वाचा >> ''... नाहीतर ठाकरे, पवारांनी भाजप संपवली असती''

"मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की, हसन मुश्रीफचा असो... संशोधन माझं, कमिटमेंट माझी, आक्रमकपणा माझा, पण पहिली राजकीय चर्चा आम्ही करतो. त्यात झालं की, गो अहेड (सुरू करा.) मग झालं", असं किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्यांची संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

 

देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांना काय म्हणालेले?

याच प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी माझी स्वतःचीच इच्छा होती की, मुंबई महापालिका... त्याचा जो भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेला या मातोश्री आणि त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना ते आवडलं. दिल्लीला पटलं. आणि त्यांनी सांगितलं."

हेही वाचा >> काँग्रेसने भिवंडीची जागाही गमावली, पवारांनी जाहीर केला उमेदवार

"मी त्यांना सांगितलं होतं की, ठाकरे नको, आपण त्याच्याशिवाय सगळे भ्रष्टाचार... देवेंद्रजींनी सांगितलं की, हा पक्षाचा आदेश आहे की, त्यांनी जो काही गोंधळ घातला असेल, जो महापालिकेशी संबंधित असेल, तर काढायला हवा. मुंबईसाठी माझी वचनबद्धता आणि पक्षाचा निर्णय", असे उत्तर किरीट सोमय्या यांनी दिले.