मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल (15 जानेवारी) मतदान पार पडले असून, राज्य निवडणूक आयोगाने सरासरी ४६-५०% मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. मतमोजणी आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, निकाल हळूहळू जाहीर होतील. आम्ही आपल्याला राज्यातील 29 महापालिकांच्या निकालाचे LIVE UPDATE हे देणार आहोत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निकालाचे LIVE अपडेट
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
निवडणुकीचा निकाल आता समोर येण्यासाठी काही तास शिल्लक असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदानाआधी आणि मतदानाच्या वेळी देखील वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, मात्र हाच वाद मतमोजणी वेळी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले. मतमोजणीच्या चार तास आधीच बॅरिगेट लावल्याने जाण्यासाठी टूरचा रस्ता असल्याने नागरिकांनी संतापही व्यक्त केला.
- महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल
निकाल कधी आणि कसे पाहता येतील?
मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्याचे लाइव्ह अपडेट्स आणि प्रत्येक घडामोड ही आपल्याला मुंबई Tak वर पाहता येईल. याशिवाय मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला याबाबत राजकीय तज्ज्ञांचे विश्लेषणही पाहता येईल.
ADVERTISEMENT











