DV Research VVCMC Exit Poll 2026, वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका (व्हीव्हीसीएमसी) निवडणुकीत बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) 85 ते 95 जागांसह प्रचंड बहुमत मिळवणार असल्याचा अंदाज डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलनुसार, बीव्हीएला 54 टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (भाजप) 20 ते 30 जागांसह 41 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना केवळ 0 ते 02 जागा आणि 5 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. हे एक्झिट पोल 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात आले असून, निकाल उद्या किंवा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
डीव्ही रिसर्चने जारी केलेल्या या एक्झिट पोलचे उद्दिष्ट मतदारांचा एकूण कल काय आहे? हे जाणून घेणे आहे. या सर्वेक्षणात ग्राउंड-लेव्हल जनमताचा आढावा घेण्यात आलाय. वसई-विरार महापालिकेत 29 वॉर्डांमधून एकूण 115 नगरसेवक निवडले जातात. त्यामुळे या सर्व्हेमध्ये समावून घेतलेल्या लोकांची संख्या देखील मोठी आहे.
एक्झिट पोलची मुख्य वैशिष्ट्ये
डीव्ही रिसर्चने या एक्झिट पोलसाठी विस्तृतपणे आढावा घेतलाय. यात एकूण 9,500 लोकांचा कल विचारात घेण्यात आलाय, जे सर्व मतदान केलेल्या मतदार आहेत. हे सर्वेक्षण एक्झिट पोलसाठी असून, मुलाखतींवर आधारित आहे. फील्डवर्क 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत प्रत्येक निवडणूक टप्प्यानुसार घेण्यात आले. सर्व्हेचे स्वरूप: हे स्ट्रॅटिफाइड रँडम सँपलिंग पद्धतीने घेण्यात आले. वॉर्डांची निवड वसई-विरारच्या भौगोलिक क्षेत्र, शहरी निवासी क्लस्टर्स तसेच पूर्वीच्या महापालिका मतदान ट्रेंड्सवर आधारित आहे. प्रत्येक वॉर्डात रँडमली निवडलेल्या मतदान केंद्रांवर 10-15 मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती मतदानानंतर लगेच घेण्यात आल्या. सँपलमध्ये बहुसंख्य शहरी मतदारांचा समावेश आहे.
कोणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?
बीव्हीए : 85-85
भाजप: 20-30
इतर: 0-02
या अंदाजानुसार, बीव्हीएला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते वसई-विरार महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवू शकतात. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांना जागा कमी मिळण्याची अपेक्षा आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना नाममात्र जागा मिळण्याचा अंदाज आहे. हे निष्कर्ष मतदारांच्या मुख्य मुद्द्यांवर आधारित आहेत. स्थानिक नागरी मुद्दे जसे रस्ते, पाणीपुरवठा, भ्रष्टाचार आणि शासन हे मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, महापालिका नेतृत्व आणि प्रशासनाबाबतच्या समाधानाचे मूल्यमापनही करण्यात आले.
या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे स्थानिक पक्षांमध्ये उत्साह आणि चिंता दिसून येत आहे. बीव्हीएच्या नेत्यांनी या अंदाजाचे स्वागत केले असून, ते जनतेच्या समर्थनाचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपने एक्झिट पोलवर शंका उपस्थित केल्या असून, वास्तविक निकाल वेगळे असतील असा दावा केला आहे. इतर पक्षांनीही या अंदाजावर प्रतिक्रिया देत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर भाष्य केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











