Uddhav Thackeray showed the Mumbai Tak fact check video : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई सहजरित्या पुसता येत असल्याचं समोर आलं होतं. याबाबत 'मुंबई Tak' ने फॅक्ट चेक देखील केला होता. यामधून सुद्धा शाई सहजरित्या पुसता येत असल्याचं समोर आलं होतं. आता 'मुंबई Tak'चा हाच व्हिडीओ माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दाखवलाय. शिवाय, मार्कर पेनवरुन देखील उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला घेरलेलं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray LIVE | BMC निवडणुकीत मार्कर पेन वाद | तातडीची पत्रकार परिषद | BMC Polling Mumbai
हेही वाचा : मार्कर पेनवरून उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांबाबत केली 'ती' मागणी म्हणाले, 'निवडणूक आयुक्तांना...'
उद्धव ठाकरे म्हणाले, महापालिकांच्या निवडणुका एकूण 9 वर्षांनंतर होत आहेत. मात्र, निवडणूक कार्यक्रमात कोणतीही सुधारणा दिसत नाही. निवडणूक आयुक्त कसले पैसे खात आहेत. बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मला आणखी एक मेसेज आलाय, संविधान म्हणत आहे मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणतोय करुनच दाखवा. मुख्यमंत्री त्यांचे घरगडी म्हणून निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत आहेत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही? यावेळी सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. मी परवा ठाण्यात गेलो तेव्हा त्यांना कोट्यवधींच्या ऑफर देण्यात आल्याचं समोर आलं. मला वाटतं यांच्याकडे कर्तृत्व काहीच नाही, म्हणून वाटेल ते करा. गणेश नाईकांच्या टांगा फिरुन दुखल्या, ही मंत्र्यांची परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टींवर इलाज करायचं असेल तर निवडणूक आयुक्तांना निलंबित करायला हवं.
काही वाटेल ते करा, पण सत्ता काबिज करा, हेच सुरु आहे. आम्ही दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे त्यांना दिले. त्यानंतरही आम्हाला दुबार मतदारांच्या नोंदी सापडत आहेत. काहींना मतदान केंद्र सापडत नाहीत. शाई पुसली जात आहे. ही बोटावरची शाई नाही, लोकशाही पुसली जातेय. बरं शाई पुसल्यानंतर त्यांना डबल मतदान करता येणार नाही, हे खात्रपूर्वक आयोग कसं सांगू शकतोय? दुबार मतदार टाळण्यासाठी ते हमीपत्र घेणार होते. आत्तापर्यंत त्यांनी किती हमीपत्र घेतले आहेत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
BMC Election Voting: मार्कर पेनची बोटावरील शाई पुसते का? | Acetone Fact Check | Mumbai Tak
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











