मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election)आज (15 जानेवारी) मतदान पार पडलं. ज्यानंतर आता या निवडणुकींचे Exit Poll समोर आले आहेत. राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान घेण्यात आलं. पण अवघ्या राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडे लागून राहिलं आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. डीव्ही रिसर्च यांचा एक्झिट पोल हा आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
पाहा DV Research चा एक्झिट पोल
डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांना 107 ते 122 जागांसह बहुमत मिळवण्याच्या दिशेने असल्याचा अंदाज डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजप-शिवसेनेला 41 टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना UBT-मनसे 68 ते 83 जागांसह 33 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा>> 'शाई'मुळे लोकशाही धोक्यात? मार्कर पेनचा वाद, पुसली जाणारी शाई अन्... नेमकं खरं काय?
हे एक्झिट पोल आज, मतदान दिवशीच घेण्यात आले असून, उद्या 16 जानेवारीला अधिकृत निकाल जाहीर होणार आहेत. या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. डीव्ही रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडने जारी केलेल्या या एक्झिट पोलचे उद्दिष्ट मतदारांच्या वर्तन, प्राधान्यक्रम आणि मतदान पद्धतींचे मूल्यमापन करणे हे आहे. या अभ्यासात सर्व 227 वॉर्डांमध्ये आघाडी-आघाडीप्रमाणे मतदान हिस्सा आणि जागा प्रोजेक्शनचा अंदाज घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तृत फ्रेमवर्क तयार केला आहे. यात एकूण 26570 जणांचा या एक्झिट पोलचा समावेश आहे. हे सर्व मतदान केलेल्या मतदार आहेत.
एक्झिट पोलनुसार पाहा कोणाला किती जागा मिळतील
- शिवसेना-भाजप: 107-122
- शिवसेना UBT-मनसे: 68-83
- काँग्रेस: 18-25
- राष्ट्रवादी काँग्रेस (SP): 02-04
- इतर: 8-15
पाहा इतर संस्थांनी केलेले Exit Poll
जनमत
- भाजप-शिवसेना: 138
- शिवसेना UBT-मनसे: 62
- काँग्रेस-वंचित: 20
- इतर: 7
Axis My India
- भाजप-शिवसेना: 131-151
- शिवसेना UBT-मनसे: 58-68
- काँग्रेस-वंचित: 12-16
- इतर: 6-12
JVC
- भाजप-शिवसेना: 138
- शिवसेना UBT-मनसे: 59
- काँग्रेस-वंचित: 23
- इतर: 7
JDS
- भाजप-शिवसेना: 127-154
- शिवसेना UBT-मनसे: 44-64
- काँग्रेस-वंचित: 16-25
- इतर: 00
या सगळ्या अंदाजानुसार, भाजप-शिवसेना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवू शकतात. तर दुसरीकडे गेली 25 वर्ष ज्या उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता होती ती त्यांना गमवावी लागू शकते. कारण हे दोन्ही पक्ष मिळून 68 ते 83 जागा मिळवू शकतात. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागेल.
हे ही वाचा>> BMC Elections 2026 LIVE Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? पाहा, लाईव्ह अपडेट्स...
हे निष्कर्ष मतदारांच्या मुख्य मुद्द्यांवर आधारित आहेत. विकास, महागाई, जात आणि स्थानिक मुद्दे मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकत असल्याचे दिसून आले आहे. तसेच, सरकार आणि नगरसेवकांच्या कामगिरीबाबतच्या समाधानाचे मूल्यमापनही करण्यात आले.
ADVERTISEMENT











