मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा, अर्ज भरण्याची तारीख, मतदान ते मतमोजणी संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra Mahapalika Elections announced by State Election Commission : एकूण महानगरपालिका 29 आहेत. त्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे..- अ वर्गसाठी - 15 लाख, ब वर्गसाठी 13 लाख, क वर्गसाठी 11 लाख आणि ड वर्गसाठी 9 लाख रुपये ...

State Election Commission Press Conference

State Election Commission Press Conference

मुंबई तक

15 Dec 2025 (अपडेटेड: 15 Dec 2025, 04:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा

point

अर्ज भरण्याची तारीख, मतदान ते मतमोजणी संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra Mahapalika Elections announced by State Election Commission : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची निवडणूक आयोगाकाकडून घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (दि. 15 डिसेंबर 2025) दुपारी 4.00 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.

हे वाचलं का?

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशन पत्राची छाणणी - 31 डिसेंबर 2025

अर्ज माघारी घेण्याची मुदत - 2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी - 3 जानेवारी 2026

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, नामनिर्देशकपत्र हे ऑफलाईन स्वीकारण्यात येतील. राखीव जागांवर निवडणूक लढण्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अर्ज केला असेल तर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ही निवडणूक EVM मशीनद्वारे घेण्यात येतील. मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्र असणार आहेत. 1 जुलै 2025 पर्यंत अपडेट झालेली यादी आम्ही निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. यातील कोणतेही नाव डिलिट करण्याचे किंवा कोणाचे नाव समाविष्ट करण्याचे अधिकार नाहीत. कारण ही यादी भारतीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. दुबार मतदारांसमोर स्टार करण्यात आले आहेत. दुबार मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार? यासाठी त्याला विचारण्यात आले होते. त्यांनी सांगितलं असेल त्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान पार पडेल. जर त्यांनी तसं काही सांगितलं नसेल तर त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन मतदान करवून घेण्यात येईल..

पुढे बोलताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, मतदान जनजागृतीसाठी क्रिएटिव्ह, रिल तयार करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांसासाठी व्हिल चेअर, रॅम्प यांसारखी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही मतदान केंद्र गुलाबी मतदान केंद्र असतील. प्रचार कालावधी संपल्यानंतर प्रचारविषयक जाहिराती प्रसारीत करता येणार नाहीत. मतदानाआधी 48 तास हे बंद करण्यात येईल. राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन आम्ही त्यांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. एकूण जागा 2869 आहेत, त्यासाठी निवडणूक आहेत. एकूण महानगरपालिका 29 आहेत. त्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे..- अ वर्गसाठी - 15 लाख, ब वर्गसाठी 13 लाख, क वर्गसाठी 11 लाख आणि ड वर्गसाठी 9 लाख रुपये ...

कोणत्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या जाहीर?

MMRDA रिजन

 

मुंबई

नवी मुंबई

ठाणे

कल्याण-डोंबिवली

वसई-विरार

भिवंडी

पनवेल

मीरा-भाईंदर

उल्हासनगर

 

पश्चिम महाराष्ट्र

 

पुणे

पिंपरी-चिंचवड

कोल्हापूर

सांगली

सोलापूर

इचलकरंजी

 

उत्तर महाराष्ट्र

 

नाशिक

अहिल्यानगर

धुळे

जळगाव

मालेगाव

 

मराठवाडा

 

छ. संभाजीनगर

लातूर

नांदेड-वाघाळा

परभणी

जालना

 

विदर्भ

 

नागपूर

अकोला

अमरावती

चंद्रपूर

    follow whatsapp