देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?

राहुल गायकवाड

13 Jun 2023 (अपडेटेड: 13 Jun 2023, 07:56 AM)

नुकताच ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं आहे.

Devendra Fadnavis, Maharashtra Opinion Poll 2023 : NDA is likely to get 46 per cent of votes and MVA's vote share will be 35 per cent if elections are held today.

Devendra Fadnavis, Maharashtra Opinion Poll 2023 : NDA is likely to get 46 per cent of votes and MVA's vote share will be 35 per cent if elections are held today.

follow google news

Maharashtra politics : लोकसभा, विधानसभा निवडणुकांना एक वर्ष राहिलेलं असताना आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. विविध संस्थांकडून सध्या सर्वे करण्यात येत असून, मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. नुकताच ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना बघायला जास्त आवडेल, असा कौल दिला गेला आहे. (Maharashtra Politics news : Who Will Win If Assembly Elections Are Held Today?)

हे वाचलं का?

गेल्या काही काळामध्ये आलेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असं समोर आलं होतं. परंतु ‘झी न्यूज’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा कौल शिंदे फडणवीस सरकारच्या दिशेने दिसत आहे.

हेही वाचा >> Chavadi Impact: संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…

36 हजार लोकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. 23 मे ते 11 जून या कालावधीमध्ये हा सर्वे करण्यात आला असल्याचं ‘झी’ कडून सांगण्यात आलं आहे.

पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच हवेत…

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना 26 टक्के पसंती देण्यात आली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 11 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अशोक चव्हाणांना 9 टक्के, तर अजित पवारांना 7 टक्के व तर इतरांना 24 टक्के पसंती देण्यात आली आहे.

आज निवडणुका झाल्यास सत्ता कुणाला?

या सर्वेनुसार जर आज घडीला निवडणुका झाल्या, तर युतीला 46 टक्के मतं मिळू शकतील, तर महाविकास आघाडीला 35 टक्के मतदान होऊ शकते. यामध्येच मनसेला 3 टक्के मतं मिळू शकतात. त्याचबरोबर 2019 मध्ये काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता की, अयोग्य? या प्रश्नावर 57 टक्के मतदारांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.

युती आणि महाविकास आघाडी पैकी कुठलं सरकार चांगलं आहे? या प्रश्नावर 48 टक्के मतदारांनी युतीला समर्थन दिलं, तर 32 टक्के मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मत दिलं.

हेही वाचा >> Maharashtra : तसं बोलून फसले! अब्दूल सत्तारांची विकेट जाणार? ‘तो’ पीए कोण?

विधानसभेच्या जागांचा विचार केला, तर भाजप सेना युतीला 165 ते 185 जागा मिळू शकतील, असा कौल या सर्वे मध्ये दिला गेला आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 88 ते 118 जागा मिळू शकतात. आज निवडणुका झाल्या तर भाजप-सेना युती बहुमताचं सरकार स्थापन करु शकतं. राज ठाकरेंना या सर्वेमध्ये 2 ते 5 जागा मिळू शकतात, असं म्हंटलं आहे. तर इतर आणि अपक्ष अशा 12 ते 22 जागा मिळू शकतात.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची कामगिरी कशी?

मुख्यमंत्री म्हणून कुणाची कामगिरी चांगली होती? या प्रश्नावर केवळ 27 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली होती, असं म्हटलं आहे. तर 45 टक्के मतदारांनी ठाकरेंची कामगिरी अत्यंत वाईट होती, असं म्हंटलं आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची कामगिरी चांगली असल्याचं 51 टक्के लोकांनी म्हंटलं आहे. तर 17 टक्के मतदार शिंदेंचं काम चांगलं नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा >> “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?

मतांचा टक्केवारीचा विचार केला, तर भाजपला 30 टक्के मतं मिळू शकतात तर शिंदेंच्या शिवसेनाला 16 टक्के मतं मिळू शकतात. यातच राष्ट्रवादीला 11 टक्के, काँग्रेसला 15 टक्के तर मनसेला 3 टक्के मतं मिळू शकतात, असं या सर्वेच्या निष्कर्षात म्हटलं आहे.

    follow whatsapp