Prajakt Tanpure : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवड समितीने विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 11 नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरे यांना आहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. 11 जणांच्या यादीत कोणा-कोणाला संधी देण्यात आलीये? प्राजक्त तनपुरे नेमके कोण आहेत? सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'माझा नवरा तृतीयपंथी..' नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट; नेमकं काय घडलं?
भाजपच्या 11 उमेदवारांची संपूर्ण यादी (मतदारसंघानुसार)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे पाटील
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
सोलापूर : राजेंद्र राऊत
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड : अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील
जळगाव : नंदकिशोर महाजन
नागपूर : डॉ. राजीव पोतदार
हेही वाचा : Maharashtra Weather : जून महिन्यात मान्सूनचं टेन्शन वाढलं, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट
प्राजक्त तनपुरे कोण आहेत?
प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, शिवाजी कर्डिले यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक पार पडली. मात्र, ही पोटनिवडणूक प्राजक्त तनपुरे यांनी लढवली नाही. या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचा भरघोस मतांनी विजय झाला. अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला.
राष्ट्रवादीत फुट पडली तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कायम राहणे पसंत केले होते. प्राजक्त तनपुरे हे 2019 पूर्वी राहुरीचे नगराध्यक्ष होते. मात्र, नगराध्यक्ष असतानाच त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. प्राजक्त तनपुरेंचा एवढा छोटा राजकीय प्रवास असला तरी त्यांची राजकीय पार्श्वभूमी फार मोठी आहे. तनपुरे हे आडनाव नगरच्या राजकारणात गेली अनेक दशकं चर्चेत आहे. राहुरी सहकारी कारखाना तनपुरे कुटुंबियांनी उत्तम प्रकारे चालवला होता. सहकार क्षेत्रातही प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांचं मोठं योगदान राहिलं आहे. याशिवाय, प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करताना प्राजक्त तनपुरे काय म्हणाले होते?
विरोधी पक्षात असतानाही मी माझी भूमिका प्रामाणिकपणे पार पडली, त्याची मोठी किंमत माझ्या मतदारसंघाला मोजावी लागली. सत्ता गेल्यानंतर विकासकामांना कुठे-कुठे ब्रेक लागला, बऱ्याच कार्यकर्त्यांची तीच भावना होती. कार्यकर्त्यांचे भावनांचा आदर ठेवून, निधी कमी पडू नये हे माझ्या पक्षप्रवेशामागचं मोठं कारण आहे, असं प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेश करताना म्हटलं होतं.
ADVERTISEMENT











