Manoj jarange patil andolan antarwali sarati : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असताना मराठा समाजाकडून सरकारने आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटीत राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू करणार असून, हे आंदोलन निर्णायक असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आंदोलनासाठी गेले अन् नियतीचा घाला, बीडच्या आंदोलकाचा हृदय विकाराने मृत्यू
मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाण्याची तयारी
अंतरवाली सराटीत दाखल झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सरकारने आतापर्यंत आश्वासने दिली, मात्र ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. घणसावंगीहून आलेल्या एका आंदोलकाने सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरहून आलेल्या 50 जणांच्या गटानेही एक महिन्याचे जेवण, खाणे-पिणे आणि आवश्यक साहित्य घेऊन आल्याचे सांगितले.
हेही वाचा : MPSC पेपर लीक : सहा नेते, असंख्य फोटो..सुनील गाढवेचे कोणत्या नेत्यासोबत संबंध?
...तर महाराष्ट्रभर आंदोलनाचा उद्रेक होईल, आंदोलकांचा निर्वाणीचा इशारा
मराठा समाजाने आतापर्यंत संयमाची भूमिका घेतली, मात्र आता सहन करण्याच्या पलीकडे परिस्थिती गेल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलनाचा उद्रेक होईल, असा इशाराही देण्यात आला. आंदोलकांनी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा आदेश दिल्यास सर्व मराठा समाज त्यांच्या निर्णयानुसार मुंबईला जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पूर्वीच्या स्वरूपात स्वाधीन करून त्यावर प्रमाणपत्र आणि वैधता पूर्ण देऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात होणार असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. मुंबईला जाण्याचा निर्णय झाल्यास त्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
ADVERTISEMENT












