मुंबईत येणार? जरांगेंनी दोनवेळा सज्ज राहण्यास का सांगितलं?

मुंबई तक

• 09:50 AM • 28 Aug 2026

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलकांना दोनवेळा सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनासह मुंबई आंदोलनासाठीही तयार राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत येणार? जरांगेंनी दोनवेळा सज्ज राहण्यास का सांगितलं?

point

Manoj Jarange Patil यांनी मुंबईला जाण्यासह आणखी दोन गोष्टींसाठी सज्ज व्हायला सांगितलं?

Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईला जाण्यासह आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे. मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यास मागे हटणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. सरकारने मुंबईतील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नियम लागू केल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवलं, मात्र त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या विश्रांतीचे कारण काय? IMD विभागाचा अंदाज

आंदोलनादरम्यान नियम लागू करण्यावरही जरांगेंचा आक्षेप

मुंबईतील आंदोलनादरम्यान काही नियम लागू करण्यावरही जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला. लाऊडस्पीकर लावता येणार नाही, भडकाऊ भाषण करता येणार नाही, तसेच आंदोलन आणि निदर्शनांसाठी काही ठिकाणी निर्बंध असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी मुंबईत येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतील नागरिकांनी काही दिवस त्रास सहन करून आंदोलनाला सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. आपल्या मागण्यांसाठी आणि मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी मुंबईत येत असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : अंबरनाथ : कारमधून उपचारासाठी नेताना अल्पवयीन भाचीवर अत्याचार, मामाला अटक

मुंबईतील आंदोलन ठरल्यास माघार नाही - जरांगे पाटील 

जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. यापूर्वी आपल्यावर हल्ला झाल्याचा आणि रक्ताचा चिखल झाल्याचा उल्लेख करत यावेळी दुप्पट सावध राहण्यास त्यांनी सांगितलं. सरकारविरोधात विविध समाजघटकांमध्ये रोष असल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबईतील आंदोलन ठरल्यास ते निर्णायक असेल आणि त्यातून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या कायदेशीर आणि हक्काच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत सरकारने प्रश्न मार्गी काढावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मात्र, आंदोलकांनी 29 ऑगस्टलाच यावं, असं बंधन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 29 ऑगस्टपासून 8 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही दिवशी आंदोलक अंतरवालीत येऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला दोनवेळा सज्ज राहण्याचं आवाहन केलं. एकदा 29 ऑगस्टला अंतरवालीकडून मुंबईची तारीख ठरवण्यासाठी आणि त्यानंतर मुंबई आंदोलनासाठी सज्ज राहण्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला जाण्याचा निर्णय झाल्यास आंदोलन जिंकूनच माघारी यायचं असून, पुन्हा माघारी फिरायचं नाही, अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.