VIDEO : 'आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? जो काम करतो त्याचीच..', अजित पवारांची जीभ घसरली

Ajit Pawar : मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहाणी केली. यावेळी ते बोलत होते.

Mumbai Tak

मुंबई तक

25 Sep 2025 (अपडेटेड: 25 Sep 2025, 02:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहाणी केली

point

दरम्यान, परंड्यातील लोकांशी बोलत असताना अजित पवारांची जीभ घसरली

Ajit Pawar, Dharashiv : अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.25) पाहाणी केली. अजित पवारांनी हा दौरा सुरु असताना ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, एका तरुणाने कर्जमाफीची मागणी केल्यानंतर अजित पवार भडकलेले पाहायला मिळाले. तरुणाला प्रत्युत्तर देताना अजित पवारांची जीभ घसरलीये. अजित पवार यावेळी बोलताना नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

जीवाचं रान करून काम करतो आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं - अजित पवार 

तरुणाने कर्जमाफीची मागणी केल्यानंतर अजित पवार म्हणाले, "आम्ही काय गोट्या खेळायला आलोय? सकाळी सहा वाजता करमाळ्यावरून पाहणीला सुरुवात केली. जो काम करतो त्याचीच **. आम्ही काही झोप काढल्या नाहीत, जीवाचं रान करून काम करतो आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं" यावेळी त्यांनी सरकारतर्फे शेतकरी व पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा : शेजारी राहणाऱ्या तरुणीला अंघोळ करताना बघायचे होते, तरुणाने तिच्या बाथरुममध्ये लावला हिडन कॅमेरा, नंतर रोजच...

“सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. आम्ही आमच्या लाडक्या बहिणीसाठी 45 हजार कोटींची तरतुद केली. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची वीजमाफी केली, त्यासाठी 20 कोटी रुपये दिले. भूम-परंडा भागातील परिस्थिती समजताच मी तातडीने पावले उचलली. शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा : ठाणे: पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलं किडनॅप! बेदम मारहाण करत नदीत फेकलं अन्... नेमकं प्रकरण काय?

सोलापुरात रिक्षा चालक वाहून गेला, 7-5 दिवस झाले तो सापडला नाही - पवार 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “लातूरमध्ये भुकंप झाला त्या काळात आम्ही अनेकांचे पुनर्वसन केले. परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही. सोलापूर येथे एक रिक्षाचालक वाहून गेला, सात-आठ दिवसांपासून तो सापडलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. हा परतीचा पाऊस आहे. आपल्या आवर्षणग्रस्त भागात एवढा पाऊस क्वचितच पडतो. पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि सीना-कोळेगावसारख्या योजनांद्वारे या भागात पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली. पूर्वी पद्मसिंह पाटील यांच्याकडे पाटबंधारे खाते असताना त्यांनी काम केले, नंतर माझ्याकडे खाते आलं तेव्हाही मी प्रयत्न केले. मात्र धरण परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने धरणातील पाणी सोडावे लागले.”

Ajit Pawar यांचा तोल गेला, कर्जमाफी मागणाऱ्या तरुणावर संतापले, काय घडलं? | Dharashiv Flood 2025

 

    follow whatsapp