उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं x अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की देशाचे झेंडे करण्यात आले होते शेअर, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde x Account hack : एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमाने दिली आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे. हॅकर्सने एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानी आणि तुर्की झेंड्यांचे फोटो लावले आले होते. 

Eknath Shinde x Account hack

Eknath Shinde x Account hack

मुंबई तक

21 Sep 2025 (अपडेटेड: 21 Sep 2025, 11:56 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाऊंट हॅक

point

पाकिस्तानी आणि तुर्की झेंडे शेअर करण्यात आले

Eknath Shinde x Account hack : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात गेल्याने चर्चेत आले होते. मात्र आता एकनाथ शिंदे हे वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमाने दिली आहे. ही घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे. हॅकर्सने एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाउंटवर पाकिस्तानी आणि तुर्की झेंड्यांचे फोटो लावले आले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

नेमकं काय घडलं? 

ही घटना भारत पाकिस्तानच्या या सामन्यादरम्यान, आशिया कप सुरु असतााना दुसऱ्याच सामन्यात झाली होती. उकाउंट हॅक होताच काही अधिकाऱ्यांनी तत्काळपणे सायबर क्राइम पोलिसांना सूचना देण्यात आल्या की, X अकाउंटला पुन्हा एकदा नियंत्रित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. संबंधित अकाउंट हे तब्बल 30 ते 45 मिनिटे रिकव्हर होण्यास वेळ लागला होता. 

पीटीआय या वृत्तमाध्यमाने दिलेल्या एका वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितलं की, लोकांवर आणि डिजिटल सुरक्षेवर मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. X प्लॅटफॉर्मवर अधिकाऱ्यांची माहिती सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी नियमित देखरेख आवश्यक आहे.

हे ही वाचा : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, अपोलो रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?

सायबर गुन्ह्यात मोठी वाढ 

दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणात हॅकिंगमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. यामुळे आता सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढू लागलं आहे. याचा परिणाम हा नेटकऱ्यांच्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. वैयक्तिक माहिती प्रासारित होण्याची अधिक दाट संभावना असते. याच हॅकिंगमुळे संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यात कसलाही हलगर्जीपणा धोकादायक ठरण्याची शक्यता असते. 

    follow whatsapp