'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक

gopichand padalkar : गोपीचंद पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर जत येथे खालच्या पातळीवर टीका केली, नेमकं काय घडलं याची थोडक्यात माहिती.

gopichand padalkar

gopichand padalkar

मुंबई तक

19 Sep 2025 (अपडेटेड: 19 Sep 2025, 12:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गोपीचंद पडळकर विरूद्ध जयंत पाटील

point

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

point

नेमकं काय घडलं?

Gopichand Padalkar Controversial Statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या बेताल वक्तव्याने अनेकदा चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशन सुरु असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अंगावर गाडी घालत शिवीगाळ केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. कार्यकर्त्यांचा झालेला एकूण वाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अगदी खालच्या पातळीत टीका केली आहे. या टीकेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 12 वर्षांनंतर सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह आणि गुरु ग्रहाची होणार शुभ युती, काही राशींना सोन्याहून पिवळे दिवस येणार

गोपीचंद पडळकर यांनी याआधी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, तसेच पवार कुटुंबियांवर अनेकदा खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना एका सार्वजनिक कार्यक्रमात एकेरी उल्लेख केला आणि त्यांच्या वडिलांचं नाव घेतलं.

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

सांगलीतील जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा जयंत पाटलांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलादच वाटत नाही, काही तरी गडबड आहे?' असा सवाल करत आमदार गोपीचंद पडखळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली. गोपीचंद पडळकरांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : 71 वर्षांच्या महिलेवर जडलं प्रेम! लग्नासाठी बोलवलं अन् नको तेच घडून बसलं...

दरम्यान, जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाने आक्रमवर पावित्र्या घेतला आहे, पडळकरांच्या विरोधात सांगलीतील जतमध्ये आंदोलन करण्यात येत आहेत.

    follow whatsapp