12 वर्षांनंतर सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह आणि गुरु ग्रहाची होणार शुभ युती, काही राशींना सोन्याहून पिवळे दिवस येणार
Astrology : तब्बल 12 वर्षानंतर मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यांच्यामुळे एक नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. हा नवपंचम राजयोग 13 सप्टेंबर रोजी सुरू झाला होता. याच योगामुळे आता मंगळ ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
तब्बल 12 वर्षानंतर मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह यांच्यामुळे एक नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. हा नवपंचम राजयोग 13 सप्टेंबर रोजी सुरू झाला होता. याच योगामुळे आता मंगळ ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

2/5
मंगळ ग्रह हा तूळ राशीतील पाचव्या घरात आणि गुरु ग्रह हा मिथून राशीतील नवव्या घरात आहे. याचमुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. अशातच सिंह, मीन आणि कुंभ या तीन राशीतील लोकांना विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.

3/5
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांना नवपंचम राजयोगामुळे चांगला आर्थिक फायदा मिळेल. नोकरी बदलण्याची अधिक शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात सुवर्णसंधी मिळेल. वेतनवाढ होऊन प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

4/5
मीन राशी :
मीन राशीतील लोकांसाठी हे नवपंचम राजयोग लाभदायक आणि शुभ आहे. या राजयोगामुळे तुमच्या कुटुंबातील कलह कमी होईल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. करिअरमधील आव्हाने कमी होण्याची शक्यता आहे.

5/5
कुंभ राशी :
कुंभ राशीतील लोकांच्या जीवनात नवपंचम राजयोगामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. तसेच अध्यात्म आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढण्याची शक्यता आहे. तसेच कामावर चांगले परिणाम होण्याची शक्यता आहे. सट्टा किंवा व्यापाराशी संबंधित व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे.